भारत व्याप्त सुंदरबन कांदळवनातील वाघांच्या संख्येत वाढ; ९६ वाघांचे अस्तित्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2020
Total Views |

 tiger_1  H x W:

 
 

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सहा नव्या वाघांची नोंद

 
 
 
मुंबई (प्रतिनिधी) - जगातले सर्वात मोठे कांदळवन क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम बंगाल मधील सुंदरबन कांदळवन क्षेत्रातील वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०१९ च्या व्याघ्र गणनेत याठिकाणी ८८ वाघांचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले होते. यंदा या संख्येत आठ वाघांची भर पडली असून एकूण ९६ वाघ भारत व्याप्त सुंदरबनात अधिवास करत असल्याचे समोर आले आहे. कांदळवनांमध्ये वाघांचा अधिवास असणारे सुंदरबन हे जगातील एकमेव क्षेत्र आहे.
 
 

tiger_1  H x W: 
 
 
 
 
सुंदरबनचे साधारण १३९,५०० हेक्टरवर पसरलेले कांदळवनक्षेत्र हे भारत आणि बांग्लादेश या दोन देशांमध्ये विभागलेले आहे. सुंदरबनला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेला असून त्याला 'रामसर' स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारताकडील सुंदरबन क्षेत्राला संरक्षित वन क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या क्षेत्राचे दोन विभागात विभाजन करण्यात आले आहे. सुंदरबन व्याघ्र प्रकल्प आणि परगणा (दक्षिण) विभाग. सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाच्या चार वनपरिक्षेत्राचे (सजनाखेली वन्यजीव अभयारण्य, बशीरहाट, राष्ट्रीय उद्यान पूर्व आणि राष्ट्रीय उद्यान पश्चिम) एकूण क्षेत्रफळ सुमारे २,५८५ चौ.किमी आहे. तर परगणा (दक्षिण) विभागातील तीन परिक्षेत्राचे (मटला, रायडीघी, रामगंगा) क्षेत्रफळ सुमारे ११११,०७ चौ.किमी आहे.
 
 
 
 
 
 
'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा'च्या (एनटीसीए) मार्गदर्शक तत्त्वानुसार सुंदरबनमध्ये २०१० मध्ये  सर्वप्रथम व्याघ्र गणना करण्यात आली. त्यानंतर २०१२ पासून वन्यजीव संघटनांच्या मदतीने वन विभाग दरवर्षी वाघांची गणना करते. या गणनेसाठी 'कॅमेरा ट्रॅप'चा वापर करण्यात येतो. यंदा ही गणना डिसेंबर, २०१९ ते जानेवारी, २०२० दरम्यान पार पडली. या गणनेत वन विभागाला ९६ वेगवेगळ्या वाघांचे फोटो टिपण्यात यश मिळाले. २०१९ च्या व्याघ्र गणनेनुसार या परिसरात ८८ वाघांचा समावेश होता. म्हणजेच यंदा यामध्ये आठ वाघांची भर पडली आहे. २०१६ मध्ये या क्षेत्रात ८१ वाघांचा, २०१७ मध्ये ८७ वाघांचा, २०१८ साली ८८ वाघांचा अधिवास होता.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@