प्रशासन की भुजबळ शासन?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2020   
Total Views |
Chhagan Bhujbal_1 &n



शासन आणि प्रशासन ही लोकप्रशासनाची महत्त्वाची केंद्रे आहेत. त्यामुळे शासनाचे निर्णय, वार्ता, धोरणे ही सत्य स्वरूपात प्रसारमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचावीत यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा माहिती केंद्रातून शासकीय वार्ता, माहिती, परिपत्रके आदी बाबींची माहिती ही प्रसारमाध्यमे यांना दिली जातात. जिल्हा माहिती अधिकारी यांचे कार्यालय हे जिल्ह्याचे व जिल्ह्यातील सर्वच प्रशासकीय आस्थापने व प्रसारमाध्यमे यातील दुवा. तसेच, या कार्यालयातून प्राप्त होणार्‍या माहितीची सत्यतादेखील तितकीच योग्य आहे. अशा प्रकारचे महत्त्व या कार्यालयाला असल्याने स्वाभाविकपणे या कार्यालयाची जबाबदारीदेखील तितकीच मोठी आहे किंवा ती तशी समजली जाते. मात्र, या कार्यालयाच्या माध्यमातून एका विशिष्ट संस्थेने केलेले कार्याच्या बातम्याुची पत्रके धाडली जाऊ लागली, तर मात्र मग प्रश्नचिन्ह उभे राहते. नाशिक येथील माहिती कार्यालयाच्या माध्यमातून अधिकृतपणे प्रसारमाध्यमांच्या अधिकृत ई -मेलवर येथील ‘भुजबळ नॉलेज सिटी’ या शैक्षणिक संस्थेने कोरोना आपद्काळात काय व कसे मदतकार्य केले, याचे वृत्त धाडले जात आहे. नाशिकमध्ये या काळात अनेक सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आपले कार्य करत आहेत. मात्र, केवळ ‘भुजबळ नॉलेज सिटी’च्या मार्फत केलेल्या कार्याचीच माहिती हे कार्यालय का देत आहे? तसे, पाहता सामाजिक संस्था किंवा शैक्षणिक संस्थांनी केलेले कार्य वृत्त म्हणून देण्याची सर्वस्वी जबाबदारी त्या संबंधित संस्थेची आहे. ‘भुजबळ नॉलेज सिटी’ ही शासकीय संस्था नाही. तरीही केवळ राज्याचे कॅबिनेट मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा घनिष्ठ संबंध या संस्थेशी असल्याने या संस्थेच्या बातम्या शासकीय स्तरावरून देण्यात येत आहेत काय, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. त्यामुळे जिल्ह्यात प्रशासन आहे कीप्रशासनावर केवळ भुजबळ शासन आहे, हा प्रश्न जिल्हावासीयांना सतावत आहे. अशाप्रकारे शासकीय यंत्रणेचा आपल्या संस्था प्रसिद्धीसाठी उपयोग करणे किती संयुक्तिक आहे, याचा विचार पालकमंत्र्यांनी करणे निश्चितच आवश्यक आहे.
 
 

आशा सेविकां’चे आशादायी कार्य

 
 
 
अंगातून वाहणार्‍या घामाच्या धारा अशा स्थितीत जनप्रबोधन आणि कर्तव्य बजावण्याचा वसा घेऊन नाशिक जिल्ह्यात दिंडोरी शहर परिसरातील ‘आशा सेविका’ कोरोना लढ्याला बळ देत आहेत. कोरोना लढ्यासाठी शासन व प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना ‘आशा सेविकां’कडून कलाटणी मिळत आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना रोखला जाण्यासाठी मोठी मदत लाभली आहे. एकीकडे रखरखते ऊन आणि दुसरीकडे कोरोनामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती... यासह ग्रामीण वनवासी, वीटभट्टी, झोपडपट्टी भागातील नागरिकांचे कोरोनाबाबत काळजी घेण्याचे अज्ञान. आजार बरा करण्यापेक्षा आजार होऊ नये, याबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे ही भावना प्रबळ झाली. कोरोनाच्या भीतीमुळे सामान्य गरीब नागरिक खचून जातात. त्यामुळे इतर आजाराची अनाठायी भीती निर्माण होते. त्यामुळे कोरोनासह इतर आजार होऊ नये म्हणून दिंडोरी शहर भागात आशा सेविकांनी सामूहिक प्रबोधन सुरू केलेले आहे. काही मिनिटे उन्हात थांबल्यास अंगाची लाही लाही होते. मात्र अशा भयानक स्थितीत नागरिकांना भयंकर असणारा कोरोना होऊ नये म्हणून ‘आशा सेविका’ जागरूक झालेल्या आहेत. दिवसभर सकाळपासून सायंकाळपर्यंत परिसरातील दूर दूर असणार्‍या सर्व वीटभट्ट्या, झोपडपट्ट्या, वस्त्या ‘आशा सेविकां’कडून पिंजून काढल्या जात आहेत. वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, आहाराची व्यवस्था, सामाजिक अंतर, संचारबंदी आदींबाबत प्रबोधन केले जाते. ग्रामीण मजूर आणि वनवासी बांधवांना त्यांच्या बोलीभाषेत मार्गदर्शन करण्यात येत असल्याने याचा परिणाम जागरूकता वाढवत आहे. कोरोना लढ्याला बळ देण्यासाठी उन्हातान्हात ‘आशा सेविका’ करीत असलेले प्रयत्न प्रभावी ठरले असून नागरिकही मार्गदर्शनामुळे सजग झाल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. एकीकडे आपदा काळात आपल्या संस्थेच्या प्रसिद्धीचा महामेरू उधळण्यात धन्यता मानणारे पालकमंत्री, तर दुसरीकडे आपले कर्तव्य हाच आपला धर्म मानून काम करणार्‍या ‘आशा सेविका’ असे चित्र जिल्ह्यात आहे. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून आपली पोळी भाजणारा घटक समजात असताना ‘आशा सेविकां’चे हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आणि सामाजिक सजगतेसाठी आशादायी असेच आहे.



@@AUTHORINFO_V1@@