चीनमध्ये कोरोनावर संशोधन करणाऱ्या डॉक्टरचा गूढ मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2020
Total Views |
Dr Bing Liu_1  
 
 


बिजिंग : जगभरात चीनच्या भूमीकेबद्दल जिथे संशयाने पाहिले जात आहे, चीनमुळेच हा विषाणू जगात पसरल्याचे आरोप अमेरिकेने लावला आहे. तसेच कोरोना विषाणू चीनच्या प्रयोगशाळेतूनच जगात पसरवण्यात आला, असाही दावा केला जात आहे. या विषाणूबद्दल जो कुणी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, तो गुढरीतीने गायब होतो. इथल्या एका संशोधकाचा गूढ मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूच्या संशोधनाच्या अंतिम टप्प्यात तो असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. पोलीसांना या हत्येचे कारण समजू शकले नाही. डॉ. बिंग लिऊ (Dr Bing Liu), असे या चीनी संशोधकाचे नाव आहे.
 
 
 
बिंग लिऊ यूनिवर्सिटी ऑफ पिट्सबर्ग इथल्या वैद्यकीय केंद्रात कार्यरत होते. ३७ वर्षीय डॉक्टर आपल्या घरात एकटेच राहत. डेली मेल या रिपोर्टनुसार, डॉक्टरांच्या घरात एक बंदुकधारी व्यक्ती घुसला, त्याने सरळ गोळ्या चालवायला सुरूवात केली. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह घरात आढळला. हाओ गु (Hao Gu), असे हत्या करणाऱ्याचे नाव असून या प्रकरणानंतर त्यानेही आत्महत्या केली. डॉक्टरांना गोळ्या घालून तो गाडीत बसला. तिथेच त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली. पोलीसांच्यामते, डॉक्टर आणि आरोपी एकमेकांना ओळखत असावेत. खुनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीसांनी तपास सुरू केला असून ही हत्या का करण्यात आली याचा शोध घेतला जात आहे.
 
 
 
 
यूनिवर्सिटी ऑफ पिट्सबर्ग येथील वैद्यकीय केंद्रात ड़ॉ. लिऊ कार्यरत होते. विद्यापीठाने त्यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे. कोरोना विषाणूच्या संदर्भात महत्वपूर्ण संशोधनावर ते काम करत होते. हा शोध विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी महत्वाचा होता. दरम्यान, विद्यापीठाने हे संशोधन पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे म्हटले आहे.




@@AUTHORINFO_V1@@