कल्याण डोंबिवली बाहेरील 'नो एन्ट्री'ला स्थगिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2020
Total Views |
KDMC_1  H x W:
 
 
 
 

कल्याण :  केडीएमसीत  राहणाऱ्या मुंबईतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ये-जा करण्याबाबतच्या निर्णयाला महापालिकेनी स्थगिती दिली असून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यास वेळ लागत असल्याने तोडगा निघेपर्यंत निर्णय स्थगित केल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
 
 
 
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला होता मुंबई आणि इतर भागात काम करणाऱ्या खाजगी आणि शासकीय कर्मचारयांना ये जा करण्यावर ८ मे पासून बंदी घालण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत कल्याण डोंबिवलीत वास्तव्याला असणाऱ्या आणि मुंबईला कामाला जाणाऱ्या अनेक जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता.
 
 
 
त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातून मुंबईला कामानिमित्त ये-जा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली सर्व माहिती ई मेलद्वारे केडीएमसीला देण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु कल्याण डोंबिवलीतुन मुंबईत कामावर जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कुटुंबीयांच्या सुरक्षितेच्या दुष्टीकोनातुन अशा कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणाजवळ राहण्याची व्यवस्था होण्यास उशीर लागु शकत असल्याने तोडगा निघेपर्यंत मुंबईतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या केडीएमसी क्षेत्रात नो एन्ट्रीला आयुक्तांनी स्थगिती दिली आहे.
@@AUTHORINFO_V1@@