‘एल्सा स्पीक’चा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून मुंबईकर अजिंक्य रहाणेची वर्णी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2020
Total Views |


ajinkya rahane_1 &nb

 
 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू आणि कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. एल्सा कॉर्पोरेशन म्हणजेच इंग्लिश लँग्वेज स्पीच असिस्टंट कॉर्पोरेशन या जागतिक शैक्षणिक टेक कंपनीने बुधवारी रहाणेच्या नावाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषणा केली.

 

अजिंक्य रहाणे या ब्रँडच्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा प्रसार करणार आहे. ज्यांना इंग्रजीमध्ये प्रभुत्व मिळवायचे आहे त्यांच्यासाठी अ‍ॅप्लिकेशन उपयुक्त ठरणार आहे. तो आखाती देश, ऑस्ट्रलिया न्यूझीलंड बँकिंग ग्रुप आणि सार्क देशांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पद भूषविणार आहे. मुंबईकरांसाठी ही सर्वात अभिमानाची गोष्ट आहे.

 

जाणून घ्या काय आहे ‘एल्सा कॉर्पोरेशन इंडिया’

 

एल्सा कॉर्पोरेशन म्हणजे इंग्लिश लँग्वेज स्पीच असिस्टंट कॉर्पोरेशन यांचे ‘एल्सा स्पीक’ हे एक मोबाइल अ‍ॅप आहे. हे मोबाईल अ‍ॅप एक आर्टीफिशल इंटेलिजन्स आहे. जगातील अंदाजे १.५ अब्ज इंग्रजी भाषा शिकणारे लोक याच्याशी निगडीत आहेत. यामुळे इंग्रजी भाषा आणखी अस्खलित होऊ शकते आणि यामुळे एखाद्याच्या राहणीमानावर किंवा त्याच्या कारकीर्दीमध्ये सकारात्मक प्रभाव पडू शकतो. यामुळे इग्रजी उच्चारांच्या चुका शोधण्यास मदत होते.

 
@@AUTHORINFO_V1@@