सेवाकार्य राष्ट्राला समर्पित ; श्री श्री शंकरदेव समिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2020
Total Views |


shree sankardev samiti_1&



श्री श्री शंकरदेव समिती संस्थेचे कार्य सध्या वस्तीपातळीवरही सुरू आहे. अर्थात, कामाचे स्वरूप समाजाचे उत्थान हेच आहे. त्यातही समाज एकसंघ राहावा. या देशाप्रति त्यांची निष्ठा कायम राहावी हेच आहे. शिक्षण, आरोग्य, स्वावंलबन ही संस्थेच्या कामाची प्रेरणा आहे. नवी मुंबई स्तरावरून देशभरात कार्य करणार्‍या संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.



कर्मण्येवाधिकारस्ते मा

फलेषु कदाचन ।

मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥

 


आजपासून ५५० वर्षांपूर्वी आसाममध्ये श्री श्री शंकरदेवजी नावाचे संत होऊन गेले. त्यांच्या विचारकार्याने प्रेरित होऊन ७ वर्षांपूर्वी श्री श्री शंकरदेव समिती ही संस्था निर्माण करण्यात आली. आसाममध्ये पूर येणे ही नित्याची गोष्ट. पण या पुरामुळे तेथील सामाजिक जीवन पूर्णत: उद्ध्वस्त होते. त्यामुळे आम्ही ठरवले की या संस्थेद्वारे आसाममधील पूरपीडितांच्या मदतीसाठी कार्य करायचे. पहिल्यांदा त्यांना औषधे, जीवनपयोगी साहित्य देऊ लागलो. पण हे करत असताना आमचा आणि त्यांचा संवाद संपर्क आणि स्नेहही वाढला. मग असे वाटू लागले की, पूर आला म्हणून तात्पुरती मदत करण्याऐवजी यांचे कायमचे पुनर्वसन करायला हवे. संस्थेची जबाबदार पदाधिकारी म्हणून संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना जावणते की, आज कोरोनाच्या आपत्तीकाळात संस्थेच्या कामाचे स्वरूपही बदलले आहे. वारंवार हात धुणे, ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळणे वगैरेसंबंधी जागृती करणे आवश्यक होते. संस्थेच्या माध्यमातून २३ मार्चपासूनच हॅण्ड सॅनिटायझर्स शेकडो गरजू कुटुंबीयांना वितरीत करण्यात आले. पण हे काम करत असतानाही असे जाणवले की लोकांना साधनसामुग्रीची गरज आहे, त्याहीपेक्षा समुपदेशनाची गरज विद्यार्थी मुंबईत शिकायला येतात. आजच्या परिस्थितीत त्यांना काय वाटत असेल? त्यांना परत आपल्या घरी जायचे असेल किंवा इतरही काही समस्या असतील. तर त्यांना माहिती देणे, त्यांना पडलेल्या प्रश्नांना उत्तर देणे हे गरजेचे होते. त्यासाठी संस्थेने एक हेल्पलाईन तयार केली. त्याद्वारे विद्यार्थ्यांचे समुपदेशन करायला सुरुवात केली.


आज कोरोना आपत्तीच्या काळात संस्थेने देशभरात ९७०० कुटुंबीयांना समुपदेशन केले, तर ओमान आणि इतर अरब राष्ट्रांमध्ये अडकलेल्या अशा ५५० कुटुंबीयांना मदत केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा संस्थेला हा अनुभव नवीन होता. समुपदेशन करण्यासाठी संस्थेने समाज प्रसारमाध्यमांचाही वापर केला. व्हॉटसअ‍ॅप, ट्विटर,फेसबुकच्या माध्यमातून संस्थेने अगणित लोकांचे समुपदेशन केले. कोरोना आपत्तीच्या काळात लोकांच्या समोर उभ्या ठाकलेल्या समस्यांचा या माध्यमावर उद्रेकच होत होता. याच काळात संस्थेने गरीब वृद्ध, गरजू कुटुंबीय, नाका कामगार, खासगी क्षेत्रात चतुर्थ श्रेणीचे काम करणार्‍या व्यक्ती, घरकाम करणार्‍या महिला यासाठीही काम केले. सात वर्षांपासून सामाजिक काम करताना संस्थेला या सर्व घटकांचा थोडाफार अंदाज होताच. या सर्वांचे सर्वेक्षण करून संस्थेने तात्काळ एक यादी बनवली. या लोकांना कोणत्या प्रकारची मदत हवी आहे हेही त्यात नमूद केले. लोकांना सहकार्याची विनंती केली. त्यातूनच या गरजू लोकांना संस्था आवश्यक ती मदत करू शकली. हे सगळे काम करताना परिसरातील पशुपक्षी यांचाही विचार करणे क्रमप्राप्तच होते. कारण, माणसू स्वत:च समस्याग्रस्त असताना त्याचे पशुपक्ष्यांकडे दुर्लक्ष होणे साहजिकच आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावर फिरणार्‍या प्राण्यासांठी अन्न आणि पाणी उपलब्ध करून दिले.


या काळात आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील दोन घटना सांगाव्याशा वाटतात. आम्हाला या जिल्ह्यातून दोन कॉल आले. ‘लॉकडाऊन’ च्या काळात २५ वर्षीय युवकाला हदयविकाराचा झटका आला आणि तो कोमात गेला आणि एक १९ वर्षाचा युवक असाधारण आजाराने चार महिने आजारी होता. ‘लॉकडाऊन’मुळे या दोन्ही युवकांच्या घरातल्यांना कळेचना की काय करावे? पण या दोघांच्या नातेवाईकांनी संस्थेशी हेल्पलाईनवर संपर्क साधला. संस्थेने तेथील प्रशासनाशी संपर्क साधला, इतकेच नव्हे तर या आणि अशा प्रकारच्या रूग्णांवर तात्काळ इलाज व्हावा यासाठी आसामच्या मुख्यमंत्र्यांशीही संपर्क साधला. याचा परिणाम असा झाला की या दोन्ही रूग्णांवर तात्काळ आवश्यक ते उपचार झाले. इतकेच नव्हे तर या दोन्ही रूग्णांना पुढील उपचारासाठी नामांकित दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे व्यवस्थित उपचार होत आहेत. या काळात संस्थेला नवी मुंबईच्या महापौर, प्रशासन व्यवस्थेशी मिळून काम करण्याची संधी प्राप्त झाली. या काळात शहरामध्ये जागेचे सर्वेक्षण करणे हे काम संस्थेने केले. जसे कोणत्या ठिकाणी नवीन लोक आले आहेत. कुणी विदेशी आले आहे का? जर आले असतील तर त्यांनी तसे प्रशासनाला कळवले आहे का? अशी माहिती संस्थेने मिळवली. हे सगळे काम करत असताना आम्हाला काही ठिकाणाहून माहिती मिळत होती की, ईशान्य भारतातील नागरिकांना काही ठिकाणी चिनी समजून अत्यंत वाईट वागणूक दिली गेली. ईशान्य भारतातील नागरिकांची चेहरेपट्टी थोडी वेगळी असते. पण असतात तर ते कट्टर भारतीयच. त्यांना अशी वागणूक मिळणे हे त्यांच्या, समाजाच्या आणि देशाच्या ऐक्याच्या दृष्टीनेही वाईटच. बरे हे नागरिक दिल्ली, मुंबईमध्ये येतात तेव्हा त्यांची भाषेचीही अडचण असते. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या समस्येत वाढ झाली. अशा वेळी संस्थेने शहरातील ईशान्य भारतीय लोकांची यादी बनवली. त्यांना कळवले की काहीही अडचण असेल तर भारतीय म्हणून संस्था तुमच्या सोबत आहे. नागालँण्डचे मूळ रहिवासी असलेल्या पण कामानिमित्त मुंबईत असलेल्या एका कुटुंबीयांची यावर संस्थेसाठीची प्रतिक्रिया मनाला प्रेरणा देते. या कुटुंबीयांनी असे म्हटले की, “ आज मुझे मेरे भारतीयता पर गर्व है। मेरे भारत की संस्कृति पर गर्व है।


कार्याचा विस्तार होत असतानाच स्थानिक स्तरावरही नवीन नवीन प्रश्न उभे राहत होते. जसे ‘लॉकडाऊन’मुळे कामबंद झालेल्या घरकाम करणार्‍या महिलांनी काय करावे? त्यांच्या उपजीविकेचे काय? तर त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तर केलेच. पण त्यातल्या ज्या महिला शिवणकाम करू शकत होत्या, त्यांना स्वच्छतेचे नियम पाळून मास्क बनवायचे काम दिले. मास्कसाठी कच्चा माल उपलब्ध करून दिला. त्यांचे मास्क संस्थेने विकत घेतले. त्याचे वितरण गरजूंना केले. देश संकटात असताना सर्वांनी एकत्र येत खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे. त्यात श्री श्री शकंरदेव समितीनेही आपला वाटा उचलला आहे. हे कार्य करत असताना खूप सार्‍या संस्था, शुभचिंतक संस्थेचे सहयोगी झाले. त्यामध्ये रा. स्व. संघ, प्रामुख्याने बजरंग दल आणि सेवा सहयोग या संस्थेने केलेले सहकार्य उल्लेखनीय आहे. हे सेवाकार्य राष्ट्राला समर्पित आहे. सगळ्यांचे जीवन मंगलमयी हो, सगळे सुखी होवोत, रोगमुक्त राहोत या प्रार्थनेसह संस्थेच्या वृत्ताला विराम देते.


ॐ सर्वे भवन्तु सुखिनः।

सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु।

मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥




- गायत्री गोहाँई

@@AUTHORINFO_V1@@