आयपीएलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2020
Total Views |

rajiv shukla_1  
मुंबई : क्रिकेट प्रेमींसाठी राजीव शुक्ला हे नाव आणि चेहरा नवीन नाही. आयपीएलचे अध्यक्षपद गाजवल्यानंतर आता त्यांची बीसीसीआयच्या उपाध्यक्ष पदी निवड होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. अद्याप बीसीसीआयकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरीही त्यांचे नाव निश्चित असल्याचे बोलले जात आहे. नुकतेच माहीम वर्मा यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.
 
नुकतेच माहिम वर्मा यांची उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या सचिवपदी निवड झाली. बीसीसीआयच्या नियमांनुसार एका व्यक्तीला लाभाची दोन पदे भूषवता येत नाहीत. त्यामुळे त्यांनी बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे हे पद आता रिक्त आहे. नियमानुसार येत्या ४५ दिवसांत विशेष सर्वसाधारण सभेमध्ये या पदावरील नियुक्ती गरजेची आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे ही बैठक लांबणीवर पडण्याचे चित्र आहे.
 
तसेच, आयपीएल न झाल्यास यंदा बीसीसीआयला जवळपास ४ हजार कोटींचा फटका बसणार आहे. त्यामुळे हा धोका लक्षात घेऊन आता मंडळाचे अधिकारी नव्या आयपीएल विंडोवर काम करत आहेत. ही स्पर्धा विदेशमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@