अभिमानास्पद ! भारतीय वंशाच्या सरिता कोमातीरेड्डी बनणार अमेरिकेत जिल्हा न्यायाधीश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2020
Total Views |

saritha komatireddy_1&nbs
नवी दिल्ली : सातासमुद्रापार पुन्हा एकदा भारतीय झेंडा दिमाखात फडकतो आहे. त्याचे कारण म्हणजे भारतीय वंशाच्या सरिता कोमातीरेड्डी यांची अमेरिकेच्या फेडरल कोर्टात मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांचे नाव जाहीर केले आहे. आता सरिता रेड्डी न्यूयॉर्कच्या पूर्व जिल्ह्यात न्यायाधीश पदाचा कारभार स्विकारणार आहे.
 
सरिता कोमातीरेड्डी या मुळात भारतीय वंशाच्या असल्या तरी त्यांचा जन्म हा अमेरिकेतच झाला आहे. सध्या त्या कोलंबियाच्या लॉ विद्यालयात कायद्याचे शिक्षण देतात. सरितांनी अमेरिकेत हार्वर्ड लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी प्राप्त केली आहे. तसेच त्यांनी कोलंबिया सर्किट जिल्हा अपील कोर्टाच्या तत्कालीन न्यायाधीश ब्रेट कॅव्हानोचे कायदा लिपिका म्हणून काम केले आहे.
 
यापूर्वी सरिता यांनी न्यूयॉर्कमधील माजी न्यायाधीश ब्रेट कवनुघ यांच्या अधिन काम केले आहे. जून, २०१८- जानेवारी, २०१९पर्यंत सरिता आंतरराष्ट्रीय नारकोटिक्स आणि मनी लॉन्ड्रिंगच्या डेप्युटी चीफ देखील होत्या. आणि आता थेट त्यांचे नाव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी न्यूयॉर्कच्या मुख्य न्यायाधीश पदासाठी नियुक्त केल्यानं तमाम भारतीय नागरिकांची मान गर्वाने उंचावली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@