दारू दुकाने सुरू झाल्याचा परिणाम ? : कोरोना रुग्णांच्या आकड्यात सर्वाधिक वाढ !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2020
Total Views |
Lockdown_1  H x
 



नवी दिल्ली : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर विशेषतः दारूची दुकाने सुरू केल्यानंतर रस्त्यांवर होणारी गर्दी हा चिंतेचा विषय ठरत आहे. देशात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४६ हजार ४३३ वर पोहचली आहे. आतापर्यंत १५६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये आतापर्यत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. हा परिणाम लॉ़कडाऊन शिथिल केल्याचा आहे का, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.
 
 
 
 
देशभरात गेल्या २४ तासांत ३९०० नवे रुग्ण आढळले. १९५ रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. लॉकडाऊन काही प्रमाणात सूट मिळण्यास सुरुवात झाल्याने देशात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागली. देशभरात करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली ४६, ४३३ वर, तर त्यांपैकी १२,७२७ रुग्ण बरे झाले. आता एकूण ३२,१३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. गेल्या काही दिवसांपासून भारताचा मृत्यूदर कमी झाला होता. मात्र आता पुन्हा मृत्यूदरात वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.



@@AUTHORINFO_V1@@