हंदवाडा हल्ल्यावरून बबिता फोगाट म्हणाली ‘जवाब जरूर मिलेगा!’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2020
Total Views |

babita phogat_1 &nbs
 
 
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील हंडवाडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीपीएफचे तीन जवान हुतात्मा झाले. यापूर्वी शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत सैन्य दलातील कर्नल आणि मेजरसह पाच सुरक्षा कर्मचारी शहीद झाले होते. या शहिदांना कुस्तीगीर बबिता फोगाटने श्रद्धांजली वाहिली आणि कडक शब्दात दहशतवाद्यांना चेतावणी दिली. ‘याचे उत्तर नक्की मिळेल’ अशा शब्दात तिने ट्विट करत दहाह्शात्वाद्यांना इशारा दिला.
 
 
 
 
 
बबिताने लिहिले आहे की, “हंदवाड्यात देशाच्या रक्षणासाठी हसत-हसत आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांना वंदन. अशा शूर, संन्यासी, त्याग करणाऱ्या बलिदानाचा भारताला अभिमान आहे.” यापूर्वी, भारतीय क्रिकेट संघाच्या पूर्व आणि सध्याच्या सदस्यांनी या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. कर्णधार विराट कोहलीपासून ते दिग्गज युवराज सिंह आणि माजी क्रिकेटपटू व भाजप खासदार गौतम गंभीर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.
@@AUTHORINFO_V1@@