गुड न्यूज ! लाॅकडाऊनमध्ये राणीबागेत कोल्हेकुई; नव्या पाहुण्याचे आगमन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2020   
Total Views |

jackal _1  H x  

 
 
कोल्ह्याच्या जोडीने दिला पिल्लाला जन्म

 

मुंबई (अक्षय मांडवकर) - लाॅकडाऊनमध्ये भायखळाच्या 'वीरमाता जिजाबाई भोसलेे प्राणिसंग्रहालया'त ( राणीची बाग) पाळणा हलला आहे. गेल्यावर्षी प्राणिसंग्रहालयात दाखल झालेल्या कोल्ह्याच्या जोडीला पिल्लू झाले आहे. हे पिल्लू नर असून उद्यान प्रशासन त्याची काळजी घेण्यात व्यग्र आहेत.
 
 
 
jackal _1  H x
 
 
 
 
गेल्या दोन वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत शहरातील एकमेव प्राणिसंग्रहालयाचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे. याअंतर्गत गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात मंगलोर येथील पिलीकुलालू प्राणिसंग्रहालयातून बिबट्या आणि कोल्ह्याची जोडी राणाबागेत आणण्यात आली होती. त्याबदल्यात राणीबाग प्रशासनाने त्यांना मकाऊ आणि काही पाणपक्षी दिले होते. या कोल्ह्यांच्या जोडीला साथीदार मिळावेत म्हणून प्रशासनाने सुरत येथून मे महिन्यात आणखी एक कोल्ह्याची जोडी राणीबागेत दाखल करुन घेतील. यावर्षी २६ जानेवारी रोजी या दोन्ही जोड्यांना मूळ पिंजऱ्यांत हलविण्यात आले. पिंजऱ्यात हलवल्यानंतर साधारण फेब्रुवारी महिन्यात यामधील एका जोडीने पिंजऱ्यातील आवारात खड्डा खोदण्यात सुरूवात केली आणि त्यामध्ये एका गोंडस पिल्लाला जन्म दिला.
 
 
 
 
 
 
फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यानचा काळ कोल्ह्याचा प्रजननाचा काळ असतो. या काळात मादी जमिनीत खड्डा तयार करुन त्यामध्ये पिल्लांना जन्म देते. राणीबागेत कोल्ह्यांनी तयार केलेल्या या खड्यातून एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातएक पिल्लू खड्याबाहेर पडल्याची माहिती राणीबागेतील विश्वसनीय सूत्रांनी 'महा MTB'ला दिली. हे पिल्लू नर प्रजातीचे असून साधारपणे अडीच ते तीन महिन्यांचे आहे. सध्या त्याची काळजी नर-मादी कोल्हे घेत आहेत. प्रशासनाकडूनही त्याला खाद्य दिले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत राणीबागेचे संचालक डाॅ. संजय त्रिपाठी यांना विचारले असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र, आमच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाॅकडाऊनच्या काळात राणीबाग प्रशासनाने या पिल्लावर नजर ठेवली असून त्याचे नामकरण करण्यात आलेले नाही.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@