'या' कंपनीने केली जिओमध्ये ५ हजार कोटींची गुंतवणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2020
Total Views |
JIO _1  H x W:
 
 


मुंबई : अमेरिकन कंपनी 'सिव्हर लेक'ने जिओ कंपनीमध्ये ५ हजार ६५५.७५ कोटीची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. या संदर्भात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) आणि जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडने सोमवारी घोषणा केली. या गुंतवणूकीमुळे जिओचे एकूण मुल्य ४.७० लाख कोटी रुपये आणि एंटरप्रायजेस व्हॅल्यू ५.१५ लाख कोटी रुपयांवर करण्यात आली आहे. नव्या गुंतवणुकीमुळे जिओ प्लॅटफॉर्ममध्ये सिल्व्हर लेकची १.१५ टक्के भागीदारी हिस्सा असणार आहे.


 
एप्रिलमध्ये आघाडीच्या सोशल नेटवर्कींग साईट असलेल्या फेसबूकने जिओमध्ये ४३ हजार ४७४ कोटींची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीनंतर जिओमध्ये फेसबूकची एकूण ९.९९ टक्के भागिदारी झाली आहे. २२ एप्रिल रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फेसबुकने या गुंतवणुकीची घोषणा केली होती.


काय आहे सिल्वर लेक पार्टनर्स ?


सिल्वर लेक पार्टनर्स ही एक अमेरिकन एक्विटी फर्म आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक करणे हे या कंपनीचे मुख्य उद्दीष्ट्य आहे. या कंपनीचा जगातील तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सर्वात जास्त गुंतवणूकीचा वाटा आहे. कॅलिफोर्निया येथे या कंपनीचे मुख्यालय असून झेडपीजी लिमिटेड, झुफ्फा, आयएमजी, सिल्वर लेक एलपीपी, सिल्वर लेक क्रेडिट, सिल्वर लेक पार्टनर्स लिमिटेड या तिच्या उपकंपन्या आहेत. १९९९ मध्ये ग्लेन हचिंन्स, रोजर मॅकनेमी, डेविड रोक्स, जेम्स डेविड्सन यांनी एकत्र येऊन या कंपनीची स्थापना केली.



@@AUTHORINFO_V1@@