कोरोनाच्या लढाईत बाप्पाचे आगमन कसे होणार ? वाचा गणेश मंडळांचे मत!

    04-May-2020
Total Views |
Ganesh Mandal _1 &nb
 
 
 
 
मुंबई : गणेशोत्सव कोकणातील असो किंवा मुंबईतील तो सगळीकडे धुमधडाक्यात साजरा केला जातो. यंदा मात्र, लॉकडाऊन आणि कोरोनाच्या दहशतीमुळे गणेशभक्तांमंध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. परिस्थिती येत्या दोन महिन्यांत नियंत्रणात आली नाही तर गणेशोत्सवाचे काय, असा प्रश्न गणेश मंडळांपुढे उभा आहे. यासह मूर्तींकार, सजावट करणारे आणि अन्य व्यापाऱ्यांमध्येही संभ्रम आहे.
 
 
 
कोराना संकटात गणेशोत्सव साजरा केला जाणार का नाही, याकडे लहानग्यांपासून मोठ्या मंडळींनाही चिंता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या गणेशोत्सव मंडळांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरीही हा उत्सव साजरा होणारच असा ठाम निर्धार बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला आहे.
 
 
 
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवात सोशल डिस्टंसिंग तितकेच गरजेचे आहे, असे मत मंडळाने व्यक्त केले आहे. सार्वजनिक मंडळांनी हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे मत व्यक्त केले आहे. ज्या ज्यावेळी देशावरप संकट ओढावले आहे त्या त्या वेळी गणेशोत्सव मंडळे सामाजिक दायित्व जपून सण साजरे करतात. गणेशोत्सवा दरम्यान होणारी गर्दी आणि त्यातून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका पाहता भाविक आणि कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही, असे मत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी म्हटले आहे.