कोरोनामुक्त झालेल्या बोरिस जॉन्सन यांनी अनोख्या पद्धतीने मानले डॉक्टरांचे आभार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2020
Total Views |

Boris johnson_1 &nbs


डॉक्टरांच्या नावावरून नवजात बाळाचे नामकरण करत व्यक्त केली कृतज्ञता!


न्यूयॉर्क : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे नुकतेच करोनाच्या आजारातून बरे झाले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. बुधवारी त्यांची जोडीदार कॅरी सायमंड्स यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. या बाळाचे नाव जॉन्सन यांनी त्यांच्यावर करोनाचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावावरुन ठेवत अनोख्या पद्धतीने डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सायमंड्स यांनीच यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरुन माहिती दिली.


विलफ्रड लॉरी निकोलस जॉन्सन असे या बाळाचे नाव असून निकोलस हे नाव जॉन्सन यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. निक प्रिन्स आणि निक हार्ट असं जॉन्सन यांच्यावर उपचार केले. हे दोन्ही डॉक्टर संसर्गजन्य रोग आणि व्हेंटिलेटर्स स्पेशॅलिस्ट आहेत. बाळाच्या नावाबद्दल सायमंड्स यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे.


‘विलफ्रड हे बोरिस यांच्या आजोबांचे नाव आहे. लॉरी हे माझ्या आजोबांचे नाव आहे. तर निकोलस हे डॉक्टर निक प्रिन्स आणि निक हार्ट यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. याच दोन डॉक्टरांनी मागील महिन्यामध्ये बोरिसचे प्राण वाचवले’, असे पोस्ट करत सायमंड्स यांनी या नावाची कथा सांगितली आहे. ट्विटवरुनही त्यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिसमधील डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@