कोरोनाची गुढ माहिती असणारी 'बॅट बुमन' अचानक गायब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2020
Total Views |
Bat women _1  H
 
 
बिजिंग : चीनमधील बॅट वुमन, अशा नावाने प्रसिद्ध असलेली वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (डब्ल्यूआयव्ही)ची वैज्ञानिक अचानक कुणाच्याही संपर्कात नसल्याचे उघडकीस आले आहे चीनच्या वुहान येथील लॅब आणि कोरोना विषाणूविषयी काहीतरी गुढ माहिती तिच्याकडे असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती.
 
 
 
 
वुहान लॅबमध्ये काम करणारी 'शी झेंगिल' हिला 'बॅट वूमन' म्हणून ओळखले जाते. वटवाघळांची आवड आणि त्यांच्यावरील संशोधनामुळे तिचे हे पडले. वटवाघळांवर ती संशोधन करते. चीनकडे सध्या ज्या संशयाने पाहिले जात आहे. त्यातच आता बॅट वूमनने पाश्चिमात्य देशांना या संदर्भातील माहिती दिली असल्याचा तिच्यावर आरोप लावला जात आहे. चीनी प्रसार माध्यमांनी तिच्याकडे बरिच गोपनीय माहिती असल्याचा दावा केला आहे.
 
 
 
 
अशा अफवा पसरवल्या...
 
'ग्लोबल टाइम्स'नुसार पाश्चिमात्य देशांकडे कोरोना संदर्भात माहिती उघड झाल्याची अफवा पसरली होती. शी झेंगिल हीने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले. आम्ही चुकचे काही केले नाही, माझ्या मित्र आणि कुटूंब सुरक्षित आहोत, असे म्हणत तिने नऊ छायाचित्रेही अपलोड केली. एक दिवस यावरून पडदा उठेल, असा ठाम विश्वास तिने व्यक्त केला.
 
 
 
 
वुहान लॅबच्या शास्त्रज्ञ शी झेंगिल यांनी पॅरिस दूतावासाला कोरोनासंदर्भात काही गुप्त माहिती दिली होती, अशा बातम्याही आंतरराष्ट्रीय मीडियाने प्रसिद्ध केल्या. मात्र, त्या सध्या कुठे आहेत, याबद्दल कुणालाही माहिती नाही. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे सातत्याने चीननं वुहान लॅबमधूनच कोरोना पसरवल्याचा आरोप करत आहेत. अनेक देशांनी चीनच्या भूमिकेवर संशयही व्यक्त केला आहे. त्यामुळे बॅट वूमनचे गायब होणे यातही संशय व्यक्त केला जात आहे.
 
 
 
डिसेंबर २०१९पासून ती बेपत्ता आहे. डिसेंबरमध्ये प्रथमच या विषाणूचा संसर्ग झाला. वुहानच्या सी फूड मार्केटमधूनच हा विषाणू जगभर पसरला. शी झेंगल तेव्हापासून कुठे आहे त्याबद्दल माहिती कळू शकलेली नाही. चीन सरकार तिच्याविरोधात कारवाई करणार असल्याचेही बोलले जात आहे. तिच्याकडे असलेली माहिती काय, ती कुठे आहे याबद्दलही गुप्तता कायम आहे.
@@AUTHORINFO_V1@@