मुंबई : देशामध्ये महाराष्ट्रात कोरोनाबाधीतांची संख्या ही सर्वाधिक आहे. राज्यामध्ये मुंबई, पुणे आणि ठाणे या ३ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. अशामध्ये केंद्राने सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून अशी २० पथके तयार करण्यात आली आहेत. ज्यांच्या माध्यमातून कोरोना बाधित क्षेत्रांमध्ये पाहणी करण्यात येणार आहे. शिवाय स्थानिक प्रशासनाच्या कोरोनाविरोधातील लढाईमध्ये ही पथके मोलाचे सहकार्य करणार आहेत.
केंद्राकडून करण्यात आलेल्या प्रयोजनानुसार कोरोनाचे बहुतांश रुग्ण आढळणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत मुंबई, ठाणे आणि पुण्याचा समावेश आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या अतिषय झपाट्याने वाढत आहे. शिवाय मुंबई, पुणे आणि ठाणे या भागांमध्येही कोरोना अतिशय वेगाने फोफावताना दिसत आहे. त्यामुळे या विषाणूवर आळा घालण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्थानिक प्रयत्नांना आता थेट केंद्रीय पथकांचीच साथ मिळणार आहे.