कोरोना कहर (भाग-७)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2020
Total Views |
Corona symptoms _1 &


होमियोपॅथीमध्ये कोरोना व्हायरसच नव्हे, तर कुठल्याही साथीच्या आजारावर एक निश्चित अशी उपाययोजना आहे. ‘होमियोपॅथीक केस टेकिंग’ ही इतक्या प्रभावीपणे मांडली गेली आहे की, त्याच्या सुयोग्य वापरामुळे कुठलाही आजार नष्ट करण्यासाठी ती फार उपयुक्त आहे.


शरीरशास्त्रानुसार कोरोना व्हायरसमुळे जे प्राथमिक व नंतर गुंतागुंतीचे बदल शरीरात होतात, ते लक्षणे व चिन्हांच्या रुपात रुग्णांमध्ये दिसून येतात. ही लक्षणे व चिन्हे नीट उतरवून घेतली जातात.


हा आजार मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडित असा आहे. सर्वप्रथम नाक, घसा व श्वसनमार्ग यांना प्राथमिक संसर्ग होतो व त्यानुसार सर्दी, घशामध्ये खवखवणे, घसा दुखणे अशी प्राथमिक लक्षणे दिसतात. त्यानंतर ताप येऊ लागतो. हे सर्व इन्फ्लमेशन (Inflammation)मुळे होत असते. त्यानंतर संसर्ग हा अजून आत म्हणजे फुप्फुसांपर्यंत पोहोचतो व तेथील प्राणवायूची देवाणघेवाण जेथे होते, त्या अलव्हीओलाय (alveoli) ना संसर्ग होते व त्यामुळे त्यांचे आकुंचन होते आणि तेथे सूज येते व पाणी भरते. पर्यायाने फुप्फुसे निकामी होऊ लागतात व न्यूमोनियासदृश लक्षणे दिसू लागतात. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. ही सर्व लक्षणे व त्याचबरोबर त्या रुग्णाची मानसिक लक्षणे व इतर शारीरिक चिन्हे, ही सर्व ‘केस टेकिंग’मध्ये नोंद केली जातात व त्यांच्या अभ्यासातून काही अशी औषधे निवडली जातात की, ती या आजाराला सम अशी आहेत. एकदा अशा औषधांची यादी हातात आली की, मग होमियोपॅथीच्या वैयक्तिकीकरणाच्या निकषावर प्रत्येक रुग्णाला त्याच्या प्रकृतीला सम असे होमियोपॅथीचे औषध दिले जाते.

कोविड-१९साठी होमियोपॅथीक अभ्यासात खालील लक्षणे मुख्यत्वे घेता येतील. ही लक्षणे वैद्यकीय पुस्तकाच्या अनुसार असल्याने इंग्रजीमध्येच देत आहे. कृपया समजून घ्यावी.


Cough- Dry
Cough- Dry- Night- Fever During
Cough- Dry- With Loose Cough
Chest- Inflammation of Lungs
Chest- Inflammation with Fever
Chest- Effusion
Chest- Pneumonia
Chest- Fibrosis- Pulmonary
Chest- Inflammation with weakness
Respiration- Difficult with Cough
Cough- Choking- Suffocation
General- Weakness with Cough
Fever- Continued constant Fever
Perspiration- Profuse
Fainting with standing
Mouth taste bitter
General- Collapse
Empty all gone
Sensation in the stomach
Weakness in General
Nose- Smell diminished

या सर्व शारीरिक लक्षणे व चिन्हांबरोबरच प्रत्येक रुग्णाच्या मानसिकतेचासुद्धा खूप खोलवर विचार केला जातो. त्याचबरोबर साथीच्या आजारात संपूर्ण समाजाच्या म्हणजेच सामाजिक मानसिकतेचाही विचार करून मगच होमियोपॅथीचे औषध ठरवले जाते. पुढील भागात आपण या मानसिक लक्षणांचा अभ्यास करुया.


- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@