असल्या देशद्रोह्यांवर कठोर कारवाईच हवी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2020   
Total Views |

झफरूल इस्लाम खान_1 & 



जफरूल इस्लाम खान यांनी जे वक्तव्य केले आहे त्याबद्दल आता त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा आणि धार्मिक विद्वेष पसरविल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष घायोरुल हसन रिझवी यांनीही झफरूल इस्लाम खान यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.



संपूर्ण देश कोरोना संकटाचा सामना करीत असताना काही मंडळींना समाजासमाजात फूट कशी पडेल
, असे सातत्याने वाटत असते आणि त्यांच्याकडून तशी कृतीही घडत असते. असाच काहीसा प्रकार दिल्लीच्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जफरूल इस्लाम खान यांनी केला आहे. जमात-ए-इस्लामीशी संबंधित असलेला हा नेता सध्या आम आदमी पक्षाचे शेपूट पकडून दिल्लीच्या अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनला आहे. अन्य काही धर्मांध मुस्लीम नेत्यांप्रमाणे या महाशयांनाही, भारतातील मुस्लीम समाजावर घोर अन्याय होत असल्याचे वाटत आहे. त्यातून गेल्या आठवड्यात त्यांनी भारतातील हिंदूंना एकप्रकारे धमकीच दिली आहे. भारतातील मुस्लिमांवर अन्याय, अत्याचार होत राहिले तर तुमची काही खैर नाही,” असे त्यांचे म्हणणे आहे. भारतातील मुस्लीम समाजाने आपल्यावर होत असलेला अन्यायाबद्दल अद्याप अरब जगत आणि अन्य मुस्लीम जगताकडे तक्रार केलेली नाही. तशी तक्रार केल्यास या मुस्लीम जगताच्या महालाटेच्या तडाख्यास भारतातील हिंदूना सामोरे जावे लागेल,” असे या महाभागाने धमकावले आहे.



भारतातील हिंदू समाजाच्या नेत्यांचा
धर्मांधअसा उल्लेख करून, “समस्त मुस्लीम जगत तुम्हास क्षमा करणार नाही,” असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सुनविले आहे. संपूर्ण देश कोरोना संकटाचा पूर्ण ताकदीनिशी सामना करीत आहे. समाजातील सर्व घटक एकमेकांना आधार देत या संकटातून देशाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. तबलिगीजमात आणि त्या संघटनेच्या सदस्यांनी देशाच्या विविध भागामध्ये कोरोना संकट वाढविण्यास चांगलाच हातभारलावला असला तरी देशातील जनतेने त्याबद्दल संपूर्ण मुस्लीम समाजास दोष दिलेला नाही. देश एकदिलाने या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना आणि त्या सर्व प्रयत्नांना हातभार लावायचा सोडून, जफरूल इस्लाम खान यांच्यासारखे नेते समाजात विष कालविण्याचा प्रयत्न करीत आहेत.



भारतातील मुस्लीम समाजावर जो कथित अन्याय होत आहे
, त्याबद्दल कुवेत या देशाने आपली नाराजी व्यक्त केली असून त्या देशाने, आपण भारतातील मुस्लीम समाजाच्या पाठीशी असल्याचे म्हटले असल्याचा दावा या जफरूल इस्लाम खान यांनी केला आहे. (जो पूर्णपणे खोटा आहे.) कोरोना संकट तबलिगीजमातमुळे आणखी बिकट बनले, ही वस्तुस्थिती असताना, त्याचे निमित्त करून भारतात मुस्लीम समाजावर अन्याय केला जात आहे, असा अपप्रचार पाकिस्तानकडून अरब जगतात केला जात आहे. ते सूत्र पकडून अरब जगतातील मुस्लिमांना भारतातील मुस्लीम समाजाबद्दल अत्यंत सहानुभूती असल्याचे जफरूल इस्लाम खान यांनी आपल्या पोस्टवर नमूद केले आहे.



आपल्या त्या वादग्रस्त
पोस्टमध्ये जफरूल इस्लाम खान यांनी, सध्या मलेशियामध्ये दडून बसलेल्या झाकीर नाईक या धर्मांध मुस्लीम नेत्याचीही भलामण केली आहे. झाकीर नाईक याचे नाव अरब आणि मुस्लीम जगतात घराघरात घेतले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतातील हिंदू समाजाबद्दल इतके गरळ ओकणार्‍या व्यक्तीस आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्या पदावर अजून कसे ठेवले, याचेच आश्चर्य वाटत आहे! का जफरूल इस्लाम खान यांनी जे भाष्य केले आहे, त्यास आम आदमी पक्षाचाही आतून पाठिंबा आहे? अरब जगतातील सौदी अरेबिया, ओमान, कतार या देशांनी, समाजमाध्यमांतून जो भारतविरोधी प्रचार केला जात आहे, त्यास आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे. कुवेतनेही तसेच मत व्यक्त केले आहे. असे असताना भारतातील मुस्लीम समाजास कुवेतचा पाठिंबा असल्याचे ढोल बडवून या महाशयांनी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानच्या तालावर नाचणार्‍या कुवेतच्या एका पदाधिकार्‍याच्या जुन्या कोठल्या तरी निवेदनाचा हवाला देऊन, कुवेत सरकार भारतातील मुस्लीम समाजावर होत असलेल्या अन्यायामुळे नाराज असल्याची आवई जफरूल इस्लाम खान यांनी उठविली आहे.




जफरूल इस्लाम खान यांनी जे वक्तव्य केले आहे त्याबद्दल आता त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा आणि धार्मिक विद्वेष पसरविल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष घायोरुल हसन रिझवी यांनीही झफरूल इस्लाम खान यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
जफरूल इस्लाम खान यांच्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाल्यानंतर  मे रोजी त्यांनी, आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, त्या वक्तव्यावरून राईचा पर्वत करण्यात आला, असे सांगून त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आधी वादग्रस्त वक्तव्य करायची आणि त्यावरून प्रचंड वाद निर्माण झाला की दिलगिरी व्यक्त करून मोकळे व्हायचे, असा जो पायंडा राजकारणामध्ये पडला आहे, त्याचीच रीया महाशयानीही ओढली, असेच त्याबद्दल म्हणावे लागेल.



पण
, जफरूल इस्लाम खान यांच्या वक्तव्याची सरकारने अत्यंत गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शंभराहून अधिक मान्यवर व्यक्तींनी दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे केली आहे. जफरूल इस्लाम खान यांनी जी राष्ट्रविरोधी कृती केली आहे, ती अक्षम्य असल्याचे या मान्यवरांनी नमूद केले आहे. माजी न्यायाधीश, माजी प्रशासकीय अधिकारी, निवृत्त लष्करी अधिकारी, माजी पोलीस अधिकारी आदींच्या त्या निवेदनावर सह्या आहेत. संपूर्ण देश कोरोनाची लढाई लढत असताना समाजासमाजात तेढ निर्माण करणारी ही पोस्टटाकण्याची अवदसा या जफरूल इस्लाम खान यांना कशी काय आठवली? का त्यांच्या बोलविता धनीदुसरा कोणी आहे? कोरोनाचे निमित्त करून मुस्लीम समाजास भ्रमित करण्याचे काय कमी प्रयत्न झाले? पण, तो समाज या अपप्रचारास बळी पडला नाही. काही अपवाद वगळता तो समाजही प्रशासनास सर्व ते सहकार्य करीत आहेच.



संपूर्ण मुस्लीम समाज रमजानच्या या महिन्यात
लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करीत आहे, असे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी नुकतेच एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे. चुकीचा प्रचार करून काही जण भारताची बदनामी करीत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. भारतात इस्लामोफोबियावाढत असल्याचे जे आरोप आखाती देशांमधील काही मान्यवरांकडून केले जात असल्याबद्दल विचारले असता, मुख्तार अब्बास नकवी यांनी, मोदी सरकारच्या कारकीर्दीमध्ये अल्पसंख्याक समाजासह, समाजातील कोणत्याही वर्गासमवेत भेदभाव घडल्याचे एकही उदाहरण घडलेले नाही. आपणास कोणत्याही विदेशी संघटनेला दोष द्यायचा नाही. भारतातील काही लोक चुकीचा प्रचार करून भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोदी सरकार कोणत्याही प्रकारचा भेदभाव कोणाशीही करीत नसताना, तसेच भारतातील मुस्लीम समाजावर कसलाही अन्याय होत नसताना, भारताची आंतरराष्ट्रीय आणि विशेषत: मुस्लीम जगतात प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणार्‍या जफरूल इस्लाम खान यांच्यासारख्या नेत्यांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे, तरच असल्या देशद्रोही प्रकारांना आळा बसेल.

@@AUTHORINFO_V1@@