अमेरिकन सिल्व्हर लेकची रिलायन्स जिओमध्ये ५,६५५ कोटी रुपयांची गुंतवणूक

    04-May-2020
Total Views |
मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेमधील सर्वात मोठी घडामोड म्हणजे अमेरिकन कंपनी सिव्हर लेक जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ५,६५५.७५ कोटीची गुंतवणूक करणार आहे. याबद्दल रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) आणि जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडने सोमवारी घोषणा केली. ही गुंतवणूक जिओ प्लॅटफॉर्मची इक्विटी मूल्य ४.९० लाख कोटी रुपये आणि एंटरप्रायजेस मूल्य ५.१५ लाख कोटी रुपयांवर करण्यात आली आहे. या गुंतवणुकीमुळे जिओ प्लॅटफॉर्ममध्ये सिल्व्हर लेकची १.१५ टक्के भागीदारी होईल.
एप्रिल महिन्यात दिग्गज सोशल मीडिया कंपनी फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ४३,५७४ कोटींची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुकची ९.९९ टक्के भागीदारी झाली आहे. २२ एप्रिलला रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फेसबुकने या गुंतवणुकीची घोषणा केली होती. ही भारतातील सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक होती.