बोर्‍हाडे मारहाण : एक अभ्यास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2020   
Total Views |

amol borhade_1  



अक्षयच्या प्रकरणात सत्यशील शेरकरच्या बाजूने दोन अमोल आणि केवळ हिंदुत्वविरोधी द्वेष पसरवणारी तृप्ती देसाई अचानक विविध आघाड्यांवरून एकत्र कसे आले? याचाच अर्थ पडद्यामागे बरेच काही आहे. तुर्तास अमोल कोल्हे आणि मंडळींनी अक्षय आणि सत्यशील यांचा समेट घडवला, अशी बातमी आहे.

अक्षय बोर्‍हाडे यांच्या मारहाणीचे प्रकरण आणि त्यानंतरचा सगळा घटनाक्रम अभ्यासायलाच हवा. मारहाण प्रकरणातील आरोपी सत्यशील शेरकर यांची बाजू मांडायला झपाट्याने काही लोक पुढे आले. त्यात लोकांना संभाजी महाराजांच्या नावाने फसवून खासदार झालेले अमोल कोल्हे आणि मोदी, मनू, संघ वगैरेंवरच तोंडाची वाफ दवडणारे अमोल मिटकरी यांचा सहभाग मोलाचा आहे. सत्यशील शेरकर हे माझे मित्र आहेत ते असे करू शकत नाहीत, असे कोल्हे ठाम म्हणाले. जणू सत्यशील हे कोल्हे यांचे मित्र आहेत म्हणून त्यांच्यावर कुणी बोट दाखवू नये? कोल्हे म्हणतील त्यावर महाराष्ट्राच्या जनतेने डोळे मिटून विश्वास ठेवावा? नव्हे असा अंधविश्वास आणि अहंकार कोल्ह्यांना झाला आहे. दुसरीकडे अमोल मिटकरी म्हणाले, शिखंडीच्या पाठीमागून कोल्हेंवर वार करू नका. कोल्हेंनी सत्यशील यांची बाजू घेतली म्हणून कोल्हेंना नावे ठेवू नका, नाहीतर आयुष्यभर जप करावा लागेल. आता मिटकरी यांच्या या वाक्याचा अर्थ काही लागतो का? बरं शिखंडी कोण? शोषित-वंचितांचे नाव घेत सत्तेचा घास गिळणार्‍या अमोल मिटकरी यांनी सांगावे की त्यांनी शिखंडी कुणाला म्हटले आहे. शिखंडी एकवेळ परवडले ते आपापल्या नीतिमत्तेशी प्रामाणिक तरी असतात. पण सत्ताबंध टिकवण्यासाठी हुजरेगिरी करणारे पाखंडी परवडत नाहीत. हेच ते पाखंडी ज्यांना सत्य डोळ्याने दिसते आहे, ते सत्य जाणून आहेत. पण त्यांना नाईलाजाने अन्यायाची साथ द्यावी लागते आहे. आज महाराष्ट्रात अक्षयसारखे काम करणारे अनेक जण आहेत. पण त्यांना समाजकार्य करू दिले जात नाही. कारण, उद्या हे तरूण नेते झाले तर आमचे आणि आमच्या पोराबाळांच्या नेतेपदाची घराणेशाही संपेल, असे यामागचे लॉजिक असते. असो. या वादात आता तृप्ती देसाई म्हणते की, अक्षय याचे संबंध गुन्हेगारी टोळ्यांशी आहेत. (का ? तर आशा अरूण गवळी यांनी अक्षयच्या मारहाणीचा निषेध केला म्हणून.) विचार करा, अक्षयच्या प्रकरणात सत्यशील शेरकरच्या बाजूने दोन अमोल आणि केवळ हिंदुत्वविरोधी द्वेष पसरवणारी तृप्ती देसाई अचानक विविध आघाड्यांवरून एकत्र कसे आले? याचाच अर्थ पडद्यामागे बरेच काही आहे. तुर्तास अमोल कोल्हे आणि मंडळींनी अक्षय आणि सत्यशील यांचा समेट घडवला, अशी बातमी आहे.

करमुसे ते बोर्‍हाडे
शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी करमुसे यांनाही अशीच मारहाण झाली होती. करमुसे यांनी जितेंद्र आव्हाडांचे नाव घेतले होते. तेव्हाच महाराष्ट्राच्या जनतेला पुढचे चित्र कळले होते की, करमुसे यांना न्याय मिळणार की नाही. अपेक्षेप्रमाणे सगळे सुरू आहे. करमुसे नंतर गल्लीबोळात असे कितीतरी करमुसे प्रकरण झाली असतीलही पण ‘पावसाने झोडपले आणि दादल्याने मारले तर न्याय कुणाकडे मागावा’ या म्हणीमध्ये एक अजून वाक्य जोडावे, ‘सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी मारले तर दाद कुणाकडे मागावी.’ जुन्नरच्या अक्षय बोर्‍हाडेच्याबाबतीत हेच घडले आहे. अक्षयच्या समर्थनार्थ आणि विरोधार्थही बडीबडी मंडळी उतरली आहेत. अक्षयची नाण्याची बाजू कोणती चूक की बरोबर हा न्यायनिवाडा करायला मी न्यायमूर्ती नाही. मात्र, अक्षय चुकला आहे असे स्वत:शीच ठरवत एकट्या अक्षयला गुराढोरासारखे मारणे हे कोणत्या न्यायात बसवायचे? ज्या न्यायात करमुसेंना झालेली मारहाण बसवली, त्याच न्यायात अक्षयचीही मारहाण बसवायची का? अक्षय हा सामाजिक कार्यकर्ता आहे. गावात मनोरूग्णांसाठी त्याची संस्था काम करते. अक्षय कोणी मोठ्याधाट्या नेत्याचा मुलगा नाही की साखर कारखानदाराचा वारसदार नाही. याचाच अर्थ तो काही पैसेवाला नाही. पण तरीही जमेल तशी समाजसेवा करतो. अक्षयचे म्हणणे आहे की, त्याची समाजसेवा डोळ्यात सलत असल्याने गावातील नेते सत्यशील शेरकर यांनी बंगल्यात नेऊन त्याला मारहाण केली. यावर सत्यशील यांनी मारहाणीला नकार दिला. तर अक्षयने बंगल्यातील सिसीटिव्ही फुटेज तपासून पाहा सांगितले. अर्थात, सत्यशील आणि अक्षय या दोघांचाही इतिहास पाहिला तर चित्र काय असेल याचा अंदाज येतो. शिवाजी महाराजांचा वारसा चालवत काम करणारा मराठी युवक म्हणून अक्षय याला उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. २०१२दिल्ली सामूहिक बलात्काराचा निषेध बॅनर गावात लावला म्हणून जुन्नर येथील राजमुद्रा समाजसेवी संघटनेच्या खैरे नावाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाली होती. केंद्र सरकार विरोधात गावात बॅनर लावायचे नाही, असा दमही खैरेंना मिळालेला. त्यावेळी खैरे यांना सत्यशील शेरकर यांनी मारहाण केली. आता अक्षय आणि सत्यशील यांच्यात समेट जरी घडला, तरी सत्य काय होते हा प्रश्न आहेच
@@AUTHORINFO_V1@@