अभिनेते किरण कुमार यांची कोरोनावर मात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2020
Total Views |

kiran kumar_1  



कोरोना माझ्या शरीरातून, माझ्या घरातून आणि मनातून निघून गेला; कोरोनामुक्त झाल्यावर व्यक्त केली भावना


मुंबई : ज्येष्ठ अभिनेते किरण कुमार यांनी कोरोनावर मात केली आहे. सलग तिसऱ्यांदा त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. ‘कोरोना माझ्या शरीरातून, माझ्या घरातून आणि मनातून निघून गेला आहे’. अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोरोनाच्या रूग्णांपासून अंतर ठेवा, मात्र त्यांच्यावर बहिष्कार घालू नका, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.


‘कोरोनाव्हायरसचा पराभव करण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. पण कोरोना रुग्णांवर बहिष्कार घालणे हे योग्य नाही. एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणे हा गुन्हा नाही, पण कोरोनाला लपविणे गुन्हा आहे’, असे ते म्हणाले.


जे लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांसाठी झटत आहेत, त्यांच्याशी गैरवर्तन करणे चुकीचे आहे. जर शेजारची एखादी व्यक्ती संक्रमित झाली असेल आणि ती सेल्फ आयसोलेशनमध्ये राहात असेल, तर त्याच्यासाठी उभे राहिले पाहिजे. त्या ज्येष्ठ नागरिकांचा विचार करा जे एकटे राहतात. त्यांची या परिस्थितीत काय अवस्था झाली असेल. त्यांच्या मदतीसाठी आपण पुढे यायला हवे, असेही किरण म्हणाले.


‘कोरोनाव्हायरस येथे राहण्यासाठी आला आहे. सध्या यावर उपचार नसल्यास सगळे घाबरले आहेत. पण घाबरुन जाऊ नका. काळजी घ्या आणि तुमच्यामुळे तो इतरांना होणार नाही याची खात्री करुन घ्या.', असे आवाहनदेखील त्यांनी सर्वांना केले आहे.


@@AUTHORINFO_V1@@