विद्यार्थ्यांचा कौल : परीक्षा नकोच !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2020
Total Views |
exam _1  H x W:





पुणे : राज्यातील पारंपारिक विद्यापीठांतील अंतिम सत्राच्या ८८.२० टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द व्हावी, अशी मागणी केली आहे. परीक्षेला जात असताना कोरोनाची लागण होईल, अशी भीती अनेक विद्यार्थ्यांना वाटत आहे. महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) या विद्यार्थी संघटनेतर्फे केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली आहे. ३२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. 


एका सर्वेक्षणाद्वारे विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचा अंतिम सत्र परीक्षांबद्दलचा कौल जाणून घेण्यात आला. युजीसीने दिलेल्या परीपत्रकानुसार, राज्याला कोरोना संकटामुळे परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना ग्रेड दिली जाऊ शकते. राज्य सरकारने अद्याप यावर निर्णय़ घेतलेला नाही. कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता परीक्षा रद्द करणे गरजेचे असल्याचे मत विद्यार्थी आणि पालक संघटनांतर्फे व्यक्त केले जात आहे. 
 
 
 
कोरोनाच्या संकटात परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता नसल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, मुंबई विद्यापीठ कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा अहवाल सादर करण्यात येणार आहे. संघटना अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी ही माहिती एका परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केली आहे. या सर्वेक्षणातून ७० टक्के विद्यार्थ्यांना आपली नोकरी जाण्याची भीती व्यक्त केली आहे.




@@AUTHORINFO_V1@@