'रिअल हिरो' सोनू सूदचे राज्यपालांनी केले कौतुक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2020
Total Views |

sonu sud_1  H x





मुंबई
: आज अभिनेते सोनू सुदने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहचविण्यासाठी तसेच लाखो लोकांच्या भोजन व्यवस्थेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती सूद यांनी यावेळी राज्यपालांना दिली. राज्यपालांनी सूद यांचे कौतुक करून त्यांना त्यांच्या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवित देवदूत ठरलेल्या या अभिनेत्याने केलेल्या कार्याचे सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी कौतुक केले.






अभिनेता सोनू सूदने काही दिवसांपूर्वी कर्नाटकला जाणाऱ्या मजूरांसाठी बसची सोय केली होती. कर्नाटकच्या प्रवासी मजूरांनंतर सोनूने उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या प्रवासी मजूरांची घरी जाण्याची व्यवस्था केली. केरळमध्ये अडकलेल्या ओडिशाच्या १००पेक्षा जास्त मजुरांना तर सोनू सूदने विमानाने आपल्या राज्यात पाठवले होते.सोशल मीडियावर सोनूचे खूप होत आहे. सोनूच्या मदतीनेच एक महिला बिहारमधील तिच्या गावी पोहोचली. ही महिला गरोदर होती आणि तिथे पोहोचल्यानंतर एकदम अनोख्या पद्धतीने तिने सोनूचे आभार मानले आहेत. याविषयी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सोनूने सांगितले,'मी ज्या लोकांना त्यांच्या घरी पाठवले त्यातील एका महिलेने बाळाला जन्म दिला आहे. तिने माझ्या नावावर तिच्या झालेल्या बाळाचे नाव ठेवले आहे.'
@@AUTHORINFO_V1@@