ही संघर्षाची वेळ आहे का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2020   
Total Views |


china america_1 &nbs

चीनने आपल्या ‘स्टॉक एक्स्चेंज’ व्यवहारातून अमेरिकेचे चलन असलेल्या डॉलरला बहिष्कृत केले आहे. या निर्णयाच्या माध्यमातून वैश्विक अर्थव्यवहारांवर आपला शिक्का उमटविण्याचा चीनचा हा प्रकार तर नाही ना? असा प्रश्न पुढे येत आहे.



जगभर सध्या कोरोना विषाणूने विळखा घट्ट केला आहे. त्यामुळे जग सध्या स्तब्ध झाले आहे. अशावेळी आगामी काळात पुढील वळणावर जगातील देशांची स्थिती कशी असेल? आपल्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे? पुढील वळणावर आपणास काय पाहावयास मिळेल, याची शाश्वती जागतिक स्तरावर आज तरी नाही. सध्या येणारा प्रत्येक दिवस हा अनिश्चिततेच्या गर्तेत सापडला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशावेळी जागतिक नेतृत्व म्हणून समजल्या जाणार्‍या अमेरिकेकडून समजुतदारपणा आणि प्रगल्भ विचारांची जगाला अपेक्षा आहे. तसेच, ज्या देशातून कोरोनाचा प्रसाद जगाला मिळाला, त्या चीनकडून कोरोना समस्येचे निराकरण कसे करावे, याबाबत मार्गदर्शक सूचना, उपाययोजना यांची आवश्यकता आहे. जगातील इतर राष्ट्रे मुख्यत्वे विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांची याबाबत अपेक्षा नक्कीच आहे. मात्र, अशा वेळी चीन आणि महासत्ता असणारी अमेरिका मात्र, आपापसातील संघर्षात धन्यता मानताना दिसत आहेत. नुकतेच चीनद्वारे अमेरिकी डॉलर बहिष्कृत करण्यात आले. त्यामुळे आता चीनच्या ‘युआन’ या चलनाच्या तुलतेन अमेरिकी डॉलरची घसरण होणार आहे. म्हणजेच एकप्रकारे चीनने अमेरिकेला शह देत संघर्ष ओढवून घेतला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एका वृत्तवाहिनीवर या विषयावरील चर्चेत काही तज्ज्ञांनी चीनचा हा निर्णय अमेरिका व चीन यात संघर्षाची ठिणगी म्हणून कार्य करणारा आणि युद्धजन्य परिस्थिती ओढविणारा ठरण्याची शक्यतादेखील वर्तविली आहे.
 

चीनने आपल्या ‘स्टॉक एक्स्चेंज’ व्यवहारातून अमेरिकेचे चलन असलेल्या डॉलरला बहिष्कृत केले आहे. या निर्णयाच्या माध्यमातून वैश्विक अर्थव्यवहारांवर आपला शिक्का उमटविण्याचा चीनचा हा प्रकार तर नाही ना? असा प्रश्न पुढे येत आहे. दरम्यान, चीन डॉलरशी झुंज घेण्यासाठी वेगळ्या डिजिटल चलनावरही गांभीर्याने विचार करत असल्याचे वृत्त आहे. कोरोना साथीच्या काळात चीनला जागतिक आरोग्य संघटनेमार्फत कायमच झुकते माप दिले गेले. तसेच, चीनबाबत जागतिक आरोग्य संघटनेने सुहृदयता बाळगली, असा आरोप यापूर्वीच अमेरिकेने केला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणारा निधी रोखण्याचा निर्णयदेखील ट्रम्प यांनी घेतला होता. त्यामुळे त्याचवेळी खर्‍या अर्थाने चीन आणि अमेरिका यांच्यात संघर्षाची ठिणगी प्रज्वलित झाली, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या सर्व घटनांचा वचपा म्हणून की काय चीनने अमेरिकी डॉलर बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला? चीनच्या निर्णयाला किनार काहीही असो. मात्र त्याचे परिणाम हे जगाला आणि महत्त्वाचे म्हणजे आशिया खंडाला आणि त्यातला त्यात भारताला आगामी काळात भोगावे लागण्याची शक्यता आहे. आपल्याला कोणी नाकारणे किंवा आपले महत्त्व कमी होणे हे आजवर अमेरिका पचवू शकलेली नाही. हे जगभरात स्वातंत्र्य आणि सार्वभौमता यांच्या नावाखाली अमेरिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध कारवाईतून दिसून आलेच आहे. त्यामुळे आता चीनने अशा प्रकारे अमेरिकेला चपराक देणे, अमेरिका किती काळ सहन करू शकेल हा एक प्रश्नच आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार खरेच जर युद्धजन्य परिस्थिती ओढवली, तर कोरोना पाठोपाठ किंवा कोरोनासह जगाला पुन्हा एकदा भयंकर समस्येचा सामना करावा लागू शकतो. या घडीला जगाला कोरोनामुक्तीची खर्‍या अर्थाने निकड आहे. त्या संदर्भात महासत्ता म्हणून आणि रोगाचे उगमस्थान म्हणून आपण काही करू शकतो काय? याबाबत विचारमंथन, चर्चा आणि प्रत्यक्ष कृती करणे या दोन देशांकडून जगाला अभिप्रेत आहे. मात्र, स्वतःतील अहंकार, आणि एकमेकांना कमी लेखण्याच्या स्पर्धेत जगाला अधिक संकटाकडे नेण्याचा ही राष्ट्रे प्रयत्न करताना दिसून येते.
 
अमेरिका आणि चीन यांचा संघर्ष झाल्यास पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान यांसारख्या ‘सार्क’मधील देशांना त्याची थेट झळ पोहोचेल. भारतासारख्या देशालादेखील काही समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्याची वेळ ही संघर्षाची वेळ आहे काय? याबाबत प्रगल्भतेने विचार करण्याची या दोन राष्ट्राची पाळी आता आली आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@