कोरोणाचा विळखा ‘नोकीया’लाही ; तब्बल ४२ कर्मचाऱ्यांना कोरोना?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2020
Total Views |

nokia_1  H x W:
नवी दिल्ली : जगभरामध्ये अनेक कंपन्यांना कोरोणाचा चांगलाच फटका बसला आहे. भारतामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक कंपन्यांनी त्यांच्या काही शाखा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नुकतेच, नोकिया कंपनीने तामिळनाडूमधील श्रीपेरंबदुर येथे असलेल्या आपल्या प्रकल्पाचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला. कारण, या प्रकल्पामध्ये काम करत असलेल्या काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे हे पाउल उचलल्याचे सांगण्यात आले.
 
 
दरम्यान, नोकियाने आपल्या कंपनीतील किती कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे हे स्पष्ट केले नसले, तरीही मिळालेल्या माहितीनुसार कंपनीतील ४२ कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी कंपनीने आपल्या प्रकल्पामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाझेशनही सुरू केले आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच या सर्व बाबींची खबरदारी घेऊन मर्यादित कामगारांच्या मदतीने उत्पादनाला सुरूवात केली होती. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यामध्ये काही ठिकाणी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत उद्योग सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली होती.
 
 
@@AUTHORINFO_V1@@