`त्या` मृत जवानांच्या कुटुंबीयांना पालिकेचा मदतीचा हात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2020
Total Views |
Corona_1  H x W

वारसाला नोकरी, कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण; आयुक्तांकडे प्रस्ताव मंजुरीसाठी रवाना


मुंबई : कोरोनाप्रतिबंधासाठी लढा देताना शहीद झालेल्या जवानांच्या एका वारसाला नोकरी व आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी पालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख डॉ, प्रभात रहांगदळे यांनी सांगितले. 


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णालये, रस्ते, इमारत परिसर अशा विविध ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. ही फवारणी अग्निशमन दलाचे जवान करत असून हे काम करत असताना ४० अग्निशमन दलाच्या जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोन जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत जवानांच्या कुटुंबीयांना पालिका व राज्य सरकारच्या धोरणानुसार जे काही फायदे आहेत, ते मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मृत जवानांच्या कुटुंबातील एका वारसाला नोकरी व आर्थिक मदत अशा दोन्ही गोष्टी मिळवून देण्यात येणार असून आयुक्तांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवल्याचे रंहागदळे यांनी सांगितले.


जवानांसाठी राखीव बेड्स
अग्निशमन दलाचे काम हे नेहमीच आपत्कालीन स्थितीशी सामना करण्याचे आहे. सध्या कोरोनाचे संकट असून कोरोनाला हरवण्यासाठी अग्निशमन दलातील प्रत्येक अधिकारी व जवान युध्दपातळीवर काम करत आहे. त्यांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जात आहे. जवानाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला त्वरित उपचार मिळावे यासाठी अग्निशमन दलाच्या भायखळा येथील मुख्यालय परिसरात ३० खाटांचे रुग्णालयात सज्ज ठेवण्यात आले आहे. तर चार डाक्टरांसह योग्य तो स्टाफ उपलब्ध आहे. तरी एखाद्या जवानाला अधिक त्रास वाटला तर मसीना, नायर व वोकहार्ट या तिन्ही रुग्णालयातील खाटा जवानांसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.


जवानांची विशेष काळजी
कोरोनाविरोधातील लढ्यात जवानांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी विशिष्ट प्रकारचा प्लास्टिकचा गणवेश उपलब्ध केला आहे. २४ तास काम ४८ तास आराम अशा प्रकारे जवानांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याचेही सांगण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@