त्या तिघी... स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |

Tya tighi _1  H

पतिव्रता नेणे आणिकाची स्तुती
सर्वभावे पती ध्यानी मनी

या उक्तीला सर्वार्थाने सार्थ करणार्‍या आणि आपल्या पतींनी (सावरकर बंधूंनी) चेतवलेल्या यज्ञकुंडात झोकून देऊन पतीविरह, हालअपेष्टा, उपासमार सहन करत आपल्या ध्येयापासून काकणभरही न ढळणार्‍या सावरकर कुटुंबातील तीन धीरोदात्त स्त्रिया, यशोदाबाई गणेश सावरकर (येसू वहिनी), यमुनाबाई विनायक सावरकर (माई) आणि शांताबाई नारायण सावरकर (ताई). अशा या वीरांगनांची शौर्यगाथा आजच्या तरुण पिढीला माहिती असणं, हे अज्ञात बलिदान प्रत्येक भारतीयाला ज्ञात होणं आवश्यक आहे आणि याच सार्थ भावनेने आपल्यासमोर हा इतिहास त्या तिघी... स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा या एकपात्री नाटकाच्या स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करत आहोत.

खरं तर या नाटकाच्या प्रवासाची सुरुवात अतिशय ओघाने झाली. शिक्षणाने औषधनिर्माणशास्त्रात पदव्युत्तर असूनही योगायोगाने अभिनय क्षेत्राकडे वळले आणि गेल्या तीन वर्षांपासून या क्षेत्रात व्यवसायाने पूर्णवेळ कार्यरत आहे. या क्षेत्रात काम करायला सुरुवात केल्यापासूनच एक कलाकार म्हणून एखादा उत्तम विषय, समाजात दुर्लक्षित झालेला पण खूप महत्त्वाचा आशय घेऊन काम करण्याचा मानस होता. वाचनाची आवड असल्याने एका परिचितांशी बोलताना सावरकर बंधूंच्या पत्नींवर आधारित डॉ. शुभा साठे लिखित ‘त्या तिघी’ या कादंबरीचा उल्लेख निघाला. आजपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर, त्यांचे धाकटे बंधू डॉ. नारायण सावरकर यांच्याबद्दल ऐकलं होतं, वाचलं होतं. त्यांचं कर्तृत्व, ध्येयनिष्ठा, स्वातंत्र्यकार्य, त्याग, बलिदान ज्ञात होतं, पण सावरकर बंधूंच्या पत्नींबद्दलची माहिती, त्यांचा इतिहास हा त्या तीन्ही बंधूंच्या ओघाने येणार्‍या संदर्भांइतकाच ज्ञात होता. तेव्हा विचार आला की, जर तीन्ही सावरकर बंधूंनी, राष्ट्रहिताला आपलं अंतिम ध्येय मानून धगधगत्या स्वातंत्र्यकुंडात स्वतःला झोकून दिलं असताना त्यांच्या पत्नी कशा जगल्या असतील? त्यांनी कसे दिवस बघितले असतील? एक स्त्री, एक सहधर्मचारिणी म्हणून त्यांच्या काय भावना असतील? या उत्सुकतेपोटी मी लागलीच ‘त्या तिघी’ ही कादंबरी वाचून काढली.
कादंबरी वाचताना एकच जाणवलं की, महापुरुषांच्या सहवासात राहणं आणि त्यांचं पत्नीपद भूषवणं महाकठीण असं म्हणतात, ते उगीच नाही. महापुरुषांची चरित्रे ही त्यांच्या कार्याच्या महतीने समाजात अलवार उजळून निघतात, पण त्याच महापुरुषांच्या वैयक्तिक आयुष्याची आणि ओघाने येणार्‍या कार्याची धुरा निष्ठेने पेलणार्‍या त्यांच्या पत्नींचा इतिहास मात्र कालातीत जातो. इथेही येसूवहिनी, माई आणि ताई या तिघींचाही त्याग, बलिदान हे सावरकर बंधूंच्या देशकार्याला, त्यांच्या उदात्त ध्येयाला अतिशय पूरक आणि अपरिमित आहे, पण त्यांच्या कार्याचा उल्लेख फारसा कुठेही आढळत नाही. स्वातंत्र्यवीरांची पत्नी असल्याने आपण माई सावरकरांबद्दल थोडेफार तरी ऐकीवात आहोत, पण तिन्ही बंधूंच्या राष्ट्रकार्यात येसूवहिनी आणि शांताबाईंचंही योगदान, समर्पणभाव तितकाच असीम आहे. त्यामुळे या तिघींचाही जीवनपट लोकांसमोर यावा असं मनापासून वाटलं.
त्यात कर्मधर्मसंयोगाने माझं आजोळ (मामाचे गाव) हे सावरकरांचे मूळ गाव नाशिकमधील भगूर असल्याने लहानपणापासूनच 
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल कमालीचा आदर, एक वेगळीच आस्था, त्यांच्या विचारांबद्दल, देशनिष्ठेबद्दल एक वेगळीच ओढ मनात होती. एक कलाकार म्हणून आपल्याला ज्या विषयाची, समाजातील दुर्लक्षित झालेल्या, पण खूप महत्त्वाच्या आशयाची आस होती, तो विषय हाच असं आतून जाणवलं आणि याच विषयाला एकपात्री नाट्यरुपात मांडण्याचा मी निश्चय केला. लगेचच कादंबरी लेखिका डॉ. शुभा साठे यांच्याशी संपर्क साधला. सुदैवाने नागपूरस्थित असलेल्या शुभाताई काही वैयक्तिक कारणाने तीन-चार दिवसांनी पुण्यात येणार होत्या. त्यामुळे त्यांनी मला प्रत्यक्ष भेटायला बोलावलं आणि त्या भेटीतच कादंबरीवर आधारित एकपात्री सादरीकरण करण्याची परवानगी दिली. आता मुख्य प्रश्न होता तो संहितेचा. अभिनयाबरोबरच निवेदनही करत असल्याने या आधी माझ्या निवेदनांच्या संहितांव्यतिरिक्त मी कुठलीच संहिता लिहिली नव्हती. त्यामुळे त्याकरिता शुभाताईंना विचारले असता, त्यादरम्यान त्या दुसर्‍या विषयाशी निगडित लेखन करत असल्याने, मीच या नाटकाची संहिता लिहावी, असं त्यांनी सुचवलं आणि त्यासाठी हवी ती मदत करण्याची तयारी दाखवून माझा आत्मविश्वास वाढवला. मग मी मागे वळून पाहिलेच नाही.
जवळपास आठ महिने पूर्णपणे या नाटकाच्या संहितेवर काम केलं. संहितालेखन करत असतानाच डोक्यात हळूहळू वेशभूषा, आवश्यक नेपथ्य आकार घेत होतं. त्यासाठी काही जुने चित्रपटही बघितले. मनात हळूहळू नाटकाच्या सादरीकरणाचा कच्चा आराखडा तयार होत होता. विषय निवडताना, संहितालेखन करताना आणि त्यानंतर सादरीकरण बसवताना ‘त्या तिघीं’च्या व्यक्तिमत्त्वांना, त्यांच्या अस्मितेला, एक स्त्री म्हणून कुठेही सहानुभूतीची किनार येऊ नये याची पूर्णतः वैचारिक स्पष्टता अगदी पहिल्यापासूनच मनात होती. त्यामुळे ‘त्या तिघीं’ची ही शौर्यगाथा, परिस्थितीपुढे न झुकता धैर्याने झुंजणार्‍या रणरागिणींची आहे, याच पार्श्वभूमीवर हे नाटक उभं करायचं असं पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं.
हा सगळा प्रवास सुरू असतानाच नाटक प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असणार्‍या आर्थिक पाठबळाचा विचारही मनात सुरू होता. काय करावं सुचत नव्हतं. माझ्याकडे अगदीच मोजकी शिल्लक होती, पण ती पुरेशी नव्हती. तेव्हा माझ्या आईवडिलांनी ही आर्थिक जबाबदारी उचलण्याची तयारी दाखवली. मग काय, आम्ही निर्धास्तपणे नाटक बसवण्याच्या तयारीला लागलो. नाटकाची संहिता, आर्थिक बाजू, नेपथ्य, वेशभूषा हे सगळं हळूहळू मार्गस्थ होत असताना, आता एकच प्रश्न आम्हाला सतावत होता, तो म्हणजे तालमीसाठी आवश्यक असलेल्या जागेचा. तेव्हा आमच्या मदतीला सावरकरप्रेमी आणि आमचे जवळचे स्नेही विनायक रेणके धावून आले आणि त्यांनी त्यांची भांडारकर रस्ता, पुणे येथे स्थित असलेली रिकामी वास्तू, केवळ या विषयाच्या प्रेमापोटी देऊ केली आणि आमच्या नाटकाची तालीम जोरात सुरू झाली. दिग्दर्शनाची धुरा अजिंक्य भोसले यांनी सांभाळली, तर संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अजित विसपुते यांनी घेतली. नेपथ्य आणि वेशभूषेतून १९०० चा काळ रंगमंचावर उभं करण्याचं नियोजन, माझी बहीण अश्विनी चोथे-जोशी हिने यथोचित पार पाडलं. एकपात्री नाट्यप्रयोग असल्याने प्रकाशयोजनेवर विशेष काम करुन संकेत पारखेनेही उत्तम साथ दिली. वैभव जोशी यांनीही विषयाला अनुसरून योग्य असे चित्र सजावटीचे आणि मुद्रणाचे काम पाहिले. या सगळ्यांच्या बरोबरीने मला माझ्या पडद्यामागील टीमनेही वेळोवेळी सुरेख साथ दिली.
या सगळ्या प्रवासात माझा मित्र अजित विसपुते याने मला मोलाची साथ दिली आणि त्याच्या ‘अभिव्यक्त पुणे’ या संस्थेअंतर्गत आम्ही दोघांनी मिळून ‘त्या तिघी... स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ या एकपात्री नाटकाची निर्मिती केली. दि. २३ मार्च २०१९ रोजी सुदर्शन रंगमंच, पुणे येथे आमच्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि त्या दिवसापासून आमच्या खर्‍या प्रवासाला सुरुवात झाली. या २३ मार्चला आमच्या नाटकाला एक वर्ष पूर्ण झालं आणि सांगायला अतिशय आनंद वाटतोय की, वर्षभरात ‘त्या तिघीं’च्या आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे पुणे, ठाणे, नाशिक, बेळगाव, पनवेल, यवतमाळ असे एकूण १८ प्रयोग करु शकलो.
 
पुण्यातील एका प्रयोगाला शांताबाई नारायण सावरकरांच्या स्नुषा आणि विक्रम नारायण सावरकरांच्या पत्नी स्वामिनीताई विक्रम सावरकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. ज्यांनी माई आणि ताई सावरकरांना ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवलं होतं, त्यांच्यासमोर प्रयोग सादर करणं आव्हानात्मक आणि अविस्मरणीय होतं. नाटक संपताक्षणी शाबासकी म्हणून त्यांनी मला उत्स्फूर्तपणे बक्षिसी देऊ केली. अशा माऊलीकडून मिळालेली ही शाबासकीची थाप हीच माझ्यासाठी सर्वांत मोठी पोचपावती आणि पुढच्या प्रवासासाठी मिळालेली अनमोल शिदोरी आहे.
 
‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने’ या उक्तीला सार्थपणे अनुसरत ‘त्या तिघीं’ची ही शौर्यगाथा, हा अज्ञात इतिहास, भारतात, भारताबाहेर, जिथे जिथे माणूस मनाने भारतीय आहे, तिथे तिथे प्रयोग करुन प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आम्ही असाच अव्याहतपणे चालू ठेऊ. आपणा सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद सदैव आमच्यावर असेच राहू देत. वंदे मातरम्!!!
 
पतिव्रता नेणे आणिकाची स्तुती
सर्वभावे पती ध्यानी मनी
 
या उक्तीला सर्वार्थाने सार्थ करणार्‍या आणि आपल्या पतींनी (सावरकर बंधूंनी) चेतवलेल्या यज्ञकुंडात झोकून देऊन पतीविरह, हालअपेष्टा, उपासमार सहन करत आपल्या ध्येयापासून काकणभरही न ढळणार्‍या सावरकर कुटुंबातील तीन धीरोदात्त स्त्रिया, यशोदाबाई गणेश सावरकर (येसू वहिनी), यमुनाबाई विनायक सावरकर (माई) आणि शांताबाई नारायण सावरकर (ताई). अशा या वीरांगनांची शौर्यगाथा आजच्या तरुण पिढीला माहिती असणं, हे अज्ञात बलिदान प्रत्येक भारतीयाला ज्ञात होणं आवश्यक आहे आणि याच सार्थ भावनेने आपल्यासमोर हा इतिहास त्या तिघी... स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा या एकपात्री नाटकाच्या स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करत आहोत.
-
 
खरं तर या नाटकाच्या प्रवासाची सुरुवात अतिशय ओघाने झाली. शिक्षणाने औषधनिर्माणशास्त्रात पदव्युत्तर असूनही योगायोगाने अभिनय क्षेत्राकडे वळले आणि गेल्या तीन वर्षांपासून या क्षेत्रात व्यवसायाने पूर्णवेळ कार्यरत आहे. या क्षेत्रात काम करायला सुरुवात केल्यापासूनच एक कलाकार म्हणून एखादा उत्तम विषय, समाजात दुर्लक्षित झालेला पण खूप महत्त्वाचा आशय घेऊन काम करण्याचा मानस होता. वाचनाची आवड असल्याने एका परिचितांशी बोलताना सावरकर बंधूंच्या पत्नींवर आधारित डॉ. शुभा साठे लिखित ‘त्या तिघी’ या कादंबरीचा उल्लेख निघाला. आजपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर, त्यांचे धाकटे बंधू डॉ. नारायण सावरकर यांच्याबद्दल ऐकलं होतं, वाचलं होतं.
 
त्यांचं कर्तृत्व, ध्येयनिष्ठा, स्वातंत्र्यकार्य, त्याग, बलिदान ज्ञात होतं, पण सावरकर बंधूंच्या पत्नींबद्दलची माहिती, त्यांचा इतिहास हा त्या तीन्ही बंधूंच्या ओघाने येणार्‍या संदर्भांइतकाच ज्ञात होता. तेव्हा विचार आला की, जर तीन्ही सावरकर बंधूंनी, राष्ट्रहिताला आपलं अंतिम ध्येय मानून धगधगत्या स्वातंत्र्यकुंडात स्वतःला झोकून दिलं असताना त्यांच्या पत्नी कशा जगल्या असतील? त्यांनी कसे दिवस बघितले असतील? एक स्त्री, एक सहधर्मचारिणी म्हणून त्यांच्या काय भावना असतील? या उत्सुकतेपोटी मी लागलीच ‘त्या तिघी’ ही कादंबरी वाचून काढली.

Savarkar Family _1 &
 
कादंबरी वाचताना एकच जाणवलं की, महापुरुषांच्या सहवासात राहणं आणि त्यांचं पत्नीपद भूषवणं महाकठीण असं म्हणतात, ते उगीच नाही. महापुरुषांची चरित्रे ही त्यांच्या कार्याच्या महतीने समाजात अलवार उजळून निघतात, पण त्याच महापुरुषांच्या वैयक्तिक आयुष्याची आणि ओघाने येणार्‍या कार्याची धुरा निष्ठेने पेलणार्‍या त्यांच्या पत्नींचा इतिहास मात्र कालातीत जातो. इथेही येसूवहिनी, माई आणि ताई या तिघींचाही त्याग, बलिदान हे सावरकर बंधूंच्या देशकार्याला, त्यांच्या उदात्त ध्येयाला अतिशय पूरक आणि अपरिमित आहे, पण त्यांच्या कार्याचा उल्लेख फारसा कुठेही आढळत नाही. स्वातंत्र्यवीरांची पत्नी असल्याने आपण माई सावरकरांबद्दल थोडेफार तरी ऐकीवात आहोत, पण तिन्ही बंधूंच्या राष्ट्रकार्यात येसूवहिनी आणि शांताबाईंचंही योगदान, समर्पणभाव तितकाच असीम आहे. त्यामुळे या तिघींचाही जीवनपट लोकांसमोर यावा असं मनापासून वाटलं.
 
त्यात कर्मधर्मसंयोगाने माझं आजोळ (मामाचे गाव) हे सावरकरांचे मूळ गाव नाशिकमधील भगूर असल्याने लहानपणापासूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल कमालीचा आदर, एक वेगळीच आस्था, त्यांच्या विचारांबद्दल, देशनिष्ठेबद्दल एक वेगळीच ओढ मनात होती. एक कलाकार म्हणून आपल्याला ज्या विषयाची, समाजातील दुर्लक्षित झालेल्या, पण खूप महत्त्वाच्या आशयाची आस होती, तो विषय हाच असं आतून जाणवलं आणि याच विषयाला एकपात्री नाट्यरुपात मांडण्याचा मी निश्चय केला.
 
लगेचच कादंबरी लेखिका डॉ. शुभा साठे यांच्याशी संपर्क साधला. सुदैवाने नागपूरस्थित असलेल्या शुभाताई काही वैयक्तिक कारणाने तीन-चार दिवसांनी पुण्यात येणार होत्या. त्यामुळे त्यांनी मला प्रत्यक्ष भेटायला बोलावलं आणि त्या भेटीतच कादंबरीवर आधारित एकपात्री सादरीकरण करण्याची परवानगी दिली. आता मुख्य प्रश्न होता तो संहितेचा. अभिनयाबरोबरच निवेदनही करत असल्याने या आधी माझ्या निवेदनांच्या संहितांव्यतिरिक्त मी कुठलीच संहिता लिहिली नव्हती. त्यामुळे त्याकरिता शुभाताईंना विचारले असता, त्यादरम्यान त्या दुसर्‍या विषयाशी निगडित लेखन करत असल्याने, मीच या नाटकाची संहिता लिहावी, असं त्यांनी सुचवलं आणि त्यासाठी हवी ती मदत करण्याची तयारी दाखवून माझा आत्मविश्वास वाढवला. मग मी मागे वळून पाहिलेच नाही.
 
जवळपास आठ महिने पूर्णपणे या नाटकाच्या संहितेवर काम केलं. संहितालेखन करत असतानाच डोक्यात हळूहळू वेशभूषा, आवश्यक नेपथ्य आकार घेत होतं. त्यासाठी काही जुने चित्रपटही बघितले. मनात हळूहळू नाटकाच्या सादरीकरणाचा कच्चा आराखडा तयार होत होता. विषय निवडताना, संहितालेखन करताना आणि त्यानंतर सादरीकरण बसवताना ‘त्या तिघीं’च्या व्यक्तिमत्त्वांना, त्यांच्या अस्मितेला, एक स्त्री म्हणून कुठेही सहानुभूतीची किनार येऊ नये याची पूर्णतः वैचारिक स्पष्टता अगदी पहिल्यापासूनच मनात होती. त्यामुळे ‘त्या तिघीं’ची ही शौर्यगाथा, परिस्थितीपुढे न झुकता धैर्याने झुंजणार्‍या रणरागिणींची आहे, याच पार्श्वभूमीवर हे नाटक उभं करायचं असं पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं.
 
हा सगळा प्रवास सुरू असतानाच नाटक प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असणार्‍या आर्थिक पाठबळाचा विचारही मनात सुरू होता. काय करावं सुचत नव्हतं. माझ्याकडे अगदीच मोजकी शिल्लक होती, पण ती पुरेशी नव्हती. तेव्हा माझ्या आईवडिलांनी ही आर्थिक जबाबदारी उचलण्याची तयारी दाखवली. मग काय, आम्ही निर्धास्तपणे नाटक बसवण्याच्या तयारीला लागलो. नाटकाची संहिता, आर्थिक बाजू, नेपथ्य, वेशभूषा हे सगळं हळूहळू मार्गस्थ होत असताना, आता एकच प्रश्न आम्हाला सतावत होता, तो म्हणजे तालमीसाठी आवश्यक असलेल्या जागेचा.
 
तेव्हा आमच्या मदतीला सावरकरप्रेमी आणि आमचे जवळचे स्नेही विनायक रेणके धावून आले आणि त्यांनी त्यांची भांडारकर रस्ता, पुणे येथे स्थित असलेली रिकामी वास्तू, केवळ या विषयाच्या प्रेमापोटी देऊ केली आणि आमच्या नाटकाची तालीम जोरात सुरू झाली. दिग्दर्शनाची धुरा अजिंक्य भोसले यांनी सांभाळली, तर संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अजित विसपुते यांनी घेतली. नेपथ्य आणि वेशभूषेतून १९०० चा काळ रंगमंचावर उभं करण्याचं नियोजन, माझी बहीण अश्विनी चोथे-जोशी हिने यथोचित पार पाडलं. एकपात्री नाट्यप्रयोग असल्याने प्रकाशयोजनेवर विशेष काम करुन संकेत पारखेनेही उत्तम साथ दिली. वैभव जोशी यांनीही विषयाला अनुसरून योग्य असे चित्र सजावटीचे आणि मुद्रणाचे काम पाहिले. या सगळ्यांच्या बरोबरीने मला माझ्या पडद्यामागील टीमनेही वेळोवेळी सुरेख साथ दिली.
 
या सगळ्या प्रवासात माझा मित्र अजित विसपुते याने मला मोलाची साथ दिली आणि त्याच्या ‘अभिव्यक्त पुणे’ या संस्थेअंतर्गत आम्ही दोघांनी मिळून ‘त्या तिघी... स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ या एकपात्री नाटकाची निर्मिती केली. दि. २३ मार्च २०१९ रोजी सुदर्शन रंगमंच, पुणे येथे आमच्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि त्या दिवसापासून आमच्या खर्‍या प्रवासाला सुरुवात झाली. या २३ मार्चला आमच्या नाटकाला एक वर्ष पूर्ण झालं आणि सांगायला अतिशय आनंद वाटतोय की, वर्षभरात ‘त्या तिघीं’च्या आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे पुणे, ठाणे, नाशिक, बेळगाव, पनवेल, यवतमाळ असे एकूण १८ प्रयोग करु शकलो.
 
पुण्यातील एका प्रयोगाला शांताबाई नारायण सावरकरांच्या स्नुषा आणि विक्रम नारायण सावरकरांच्या पत्नी स्वामिनीताई विक्रम सावरकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. ज्यांनी माई आणि ताई सावरकरांना ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवलं होतं, त्यांच्यासमोर प्रयोग सादर करणं आव्हानात्मक आणि अविस्मरणीय होतं. नाटक संपताक्षणी शाबासकी म्हणून त्यांनी मला उत्स्फूर्तपणे बक्षिसी देऊ केली. अशा माऊलीकडून मिळालेली ही शाबासकीची थाप हीच माझ्यासाठी सर्वांत मोठी पोचपावती आणि पुढच्या प्रवासासाठी मिळालेली अनमोल शिदोरी आहे.
 
‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने’ या उक्तीला सार्थपणे अनुसरत ‘त्या तिघीं’ची ही शौर्यगाथा, हा अज्ञात इतिहास, भारतात, भारताबाहेर, जिथे जिथे माणूस मनाने भारतीय आहे, तिथे तिथे प्रयोग करुन प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आम्ही असाच अव्याहतपणे चालू ठेऊ. आपणा सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद सदैव आमच्यावर असेच राहू देत. वंदे मातरम्!!!
 
- अपर्णा चोथे
@@AUTHORINFO_V1@@