धक्कादायक! २५ वर्षीय अभिनेत्रीने 'पोस्ट' लिहून केली आत्महत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2020
Total Views |
1 _1  H x W: 0





इंदुर : 'क्राईम पेट्रोल’ या मालिकेतील अभिनेत्री पेक्षा मेहता (२५) हिने सोशल मीडियावर एक शेवटची पोस्ट लिहीली. 'सबसे बुरा होता है सपनों का मर जाना' आणि त्यानंतर घरात गळफास घेत आत्महत्या केली. इंदुर येथील आपल्या राहत्या घरात तिने सोमवारी रात्री उशीरा गळफास लावून घेतला. मंगळवारी सकाळी तिचे शरीर पंख्याला लटकलेले आढळले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 



Preksha Mehata_1 &nb


‘क्राईम पेट्रोल’, ‘मेरी दुर्गा’ आणि ‘लाल इश्क’ या मालिकांमध्ये काम करणाऱ्या प्रेक्षाला गेल्या काही दिवसांपासून काम मिळत नसल्याने ती तणावात असल्याचे बोलले जात होते. सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टवरून तिने आत्महत्येचे पाऊल हे नैराश्येतून उचलले आहे, असा दावा केला जात आहे. टीव्ही मालिका करणारी प्रेक्षा लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटूंबियांसोबत राहत होती. पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. 


अभिनेत्री ऋचा तिवारी हिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे. ती म्हणते, "हसऱ्या चेहऱ्यामागे बऱ्याच गोष्टी लपलेल्या असतात. त्याला कुणी समजून घेऊ शकत नाही. आपण जितकी काळजी शरीर स्वास्थाची घेतो तितकी मनाचीही घ्यायला हवी. आमच्या परिवारातील एक सदस्य आता राहिली नाही.

@@AUTHORINFO_V1@@