सलमान म्हणतोय हिंदू-मुस्लीम 'भाई-भाई'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2020
Total Views |

Salman khan_1  



सलमानच्या नव्या गाण्याचा सोशल मिडीयावर धुमाकूळ!


मुंबई : दरवर्षी बॉलीवूडचा दबंग खान रमजान ईद निमित्ताने आपला नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असतो. यंदा मात्र कोरोनामुळे भाईजानची ही प्रथा खंडित झाली. मात्र प्रेक्षकांच्या आनंदावर विरजण पडणार नाही याची पुरेपूर काळजी सलमानने घेतली. चाहत्यांसाठी सलमानने त्याच्या आवाजातील 'भाई भाई' हे नवीन गाणे प्रदर्शित केले. हे गाणे स्वत: सलमान खानने लिहिले आहे. रमजान ईदचे औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या गाण्याला युट्यूबवर काही क्षणातच ४० लाखाहून अधिक व्हयूव्हज मिळाले.


२५ मेच्या संध्याकाळी प्रदर्शित झालेले सलमानचे 'भाई भाई' हे गाणे सध्या सोशल मिडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. हे गाणे साजिद-वाजिद या जोडीने संगीत बद्ध केले असून सलमान आणि डॅनिस साबरी यांनी मिळून हे गाणे लिहिले आहे. ‘हिंदू-मुस्लीम भाई-भाई’ असे बोल असणारे हे गाणे शेअर करत सलमानने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.


सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट यंदाच्या ईदला प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे सलमानचा हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. चित्रपटाची वाट बघणाऱ्या चाहत्यांसाठी यंदा सलमान खानने चित्रपटाऐवजी गाण्याचे हे अनोखे गिफ्ट दिले.



@@AUTHORINFO_V1@@