सात दशके अन्नपाणी त्यागणारे संत चुंदडीवाले माताजींचे देहावसान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2020
Total Views |

chundaliwale mataji_1&nbs



संत चुंदडीवाले माताजींनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, यांनी तब्बल ७६ वर्ष अन्नपाण्याचा त्याग केला होता
.




अहमदाबाद
: अन्नपाण्याचा त्याग केल्यांनतर जवळपास ७६ वर्षांपासून तपस्वी जीवन जगणार्‍या संत चुंदडीवाले माताजींनी काल रात्री चरडा गावात अखेरचा श्वास घेतला. त्याचे मूळ नाव प्रह्लाद जानी. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांसारख्या अनेक दिग्गज मंडळी माताजींना गुरुस्थानी मानत. मागील सात दशकांपासून अन्नपाण्याचा त्याग केला होता हे विज्ञान जगतासमोर देखील एक मोठे आव्हान बनले होते.



वयाच्या ८८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला



पालनपूर तालुक्यातील अंबामाता मंदिराजवळील गब्बर डोंगरावर गेल्या अनेक वर्षांपासून ते वास्तव्यास होते . येथेच चुंडडीवाले माताजींनी वयाच्या ८८ व्या वर्षी रात्री २च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. प्रल्हादा जानी हे वयाच्या ११व्या वर्षी अध्यात्मिक अभ्यासाकडे वळाले. योगसाधना आणि प्राणायाम याच्या जोरावर ते गेल्या ७६ वर्षांपासून काहीही न खाता आणि पाणीही न पिता जिवंत राहिले, हे विज्ञान जगताला आव्हान देणारे होते. २६आणि २७ मे रोजी त्यांचे पार्थिव अंबाजी येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर २८ मे रोजी अंत्यसंस्कार केले जातील.

लाल रंगाचे वस्त्र, नाकात नाथ आणि हातात कंगण असे दिव्य रूप



लाल रंगांचे वस्त्र, नाकात नथ आणि हातात कंगण अशीच त्यांची ओळख होती. प्रल्हाद जानी यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. किशोरवयातच त्यांनी संन्यास घेत अंबाजीच्या गब्बर डोंगरावर आध्यात्मिक अभ्यासाचे केंद्र बनविले होते. अहमदाबाद, मुंबईतील अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये सातत्याने त्यांच्या अन्नपाणी त्यागून इतकी वर्षे जगण्यावर बरेच संशोधन केले गेले, परंतु विज्ञानाला माताजींच्या उर्जाचा स्रोत कळू शकला नाही. त्यामुळे माताजींच्या निधनानंतर अन्नपाण्याविना जगणे हे आता कायम विज्ञानाचे न उलघडलेले कोडेच राहील.



अनेक दिग्गज व्यक्ती त्यांना गुरुस्थानी मानत


पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अभिनेता अक्षय कुमार आणि इतर अनेक नामवंत व्यक्ती त्यांना गुरुस्थानी मानत. गांधीनगर जिल्ह्यातील मनसा तहसीलचे चराडा गाव हे त्यांचे वडिलोपार्जित निवासस्थान आहे, परंतु अनेक दशकांपर्यंत अंबाजी हे त्यांच्या आध्यात्मिक अभ्यासाचे केंद्र होते.
@@AUTHORINFO_V1@@