चीनी ‘टिकटॉक’ला भारतीय ‘मित्रों’ने दिली टक्कर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2020
Total Views |
mitron_1  H x W


चीनी ‘टिकटॉक’ला राम राम म्हणत एका महिन्यात ५० लाख लोकांनी डाऊनलोड केले ‘मित्रों’


मुंबई : भारतीय शॉर्टव्हिडिओ मेकिंग अॅप मित्रों अॅप एका महिन्यात ५० लाखांहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. अॅप रिलीझ झाल्यापासून एका महिन्यात ‘गूगल प्ले स्टोअर’वर सर्वाधिक डाउनलोड केलेला दुसरा अ‍ॅप ठरला आहे. युट्युब आणि टिकटॉक यांच्यात गेल्या काही काळापासून इंटरनेट वॉर सुरु आहे. दरम्यान, मित्रों अॅपने वेगवान वाढ नोंदविली आहे.


हा अॅप दररोज ५ लाख लोक डाऊनलोड करत असल्याचे मोबाईल मार्केटिंग आणि डाटा एनालिटिक्स कंपनी ग्रोथ बगच्या दीपक एबोट यांनी सांगितले. आयआयटी रुकडीच्या विद्यार्थ्यांनी ‘मित्रों’ची निर्मिती केली. भारतातील टिकटॉकची वदती लोकप्रियता लक्षात घेऊन या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. टिकटॉकसारखेच पर्याय असणाऱ्या या अॅपला भारतात चांगला प्रतिसाद मिळत आहे.


दरम्यान, युट्युब आणि टिकटॉकमधील वाद अद्याप शमलेला नसून, टिकटॉकवर जोरदार टीका केली जात आहे. तसेच त्यावर अनेक अन्यायकारक गोष्टींना प्रोत्साहन मिळत असल्याचे म्हणत टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. ४.७ रेटिंग असणारे लोकप्रिय टिकटॉक अॅपची १.३ वर घसरण झाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@