धारावीत लॉकडाऊनचा फज्जा ! गावी जाण्यासाठी मजुरांची गर्दी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2020
Total Views |
Dharavi_1  H x





मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या धारावीत मंगळवारी गावाला जाण्यासाठी अचानक हजारो मजुरांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सामानासह धारावीच्या रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची धावपळ उडाली. या परिसरात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता.


परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे सोडल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील मजूर आपआपल्या गावी जाताना दिसत आहेत. लॉकडाऊन संपण्याची चिन्हे दिसत नाहीत, त्यातच मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढल्याने हवालदिल झालेल्या मजुरांनी आपल्या गावची वाट धरली आहे.



धारावीतून दादर, मुंबई सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी बसेस सोडण्यात आल्या आहेत. या बस आणि एसटीमध्ये बसून रेल्वेस्थानकात जाण्यासाठी मजुरांनी धारावीत एकच गर्दी केली. बसेस आणि एसटी आल्याची माहिती मिळाल्यानंतर बघता बघता हजारो मजूर धावतच रस्त्यावर आले. त्यामुळे एकाचवेळी हजारो लोक धारावीत जमा झाल्याचे चित्र निर्माण झाल. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मजुरांना रांगा लावण्यास सांगितलं. मजुरांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उत्तरप्रदेश, बिहार आदी राज्यातील हे मजूर होते.
@@AUTHORINFO_V1@@