राज्याची सुत्रे पवारांनी हाती घेतली आहेत का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2020
Total Views |
Sharad Pawar _1 &nbs



मुंबई :
महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, इथल्या राजकीय क्षेत्रातील हालचाली मात्र, थंड होत नाहीत. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली राज्यातील विविध विषयांवर चर्चा केल्याचे राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आले. परंतू, या सर्व घडामोडी इतक्या वेगाने का होत आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या बैठकीला न जाणे राऊत मग आता पवार यांच्या भेटीमुळे एकूणच राजकीय वर्तूळात चर्चा केली जात आहे. 


खासदार संजय राऊत भेट

काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट झाली. राज्यपालांवर टीका करणारे राऊत राजभवनावर जाऊन विनम्र होतात. त्यानंतर लगेचच शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेण्याचे कारण काय ?, अशी चर्चा सुरू आहे. यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारच्या धोरणात्मक त्रुटी दाखवण्यासाठी राजभवनाचा रस्ता धरला होता. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने विरोधकांवर टीका करत आमच्याशी चर्चा करा, असे आवाहन भाजपला केले होते.




Raut _1  H x W:


उद्धव ठाकरे बैठकीला गैरहजर
राज्यपालांनी कोरोना संदर्भात बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहीले. मात्र, काही दिवसांपूर्वी राज्यपालांच्या कोट्यातून आमदार होण्यासाठी त्यांनी आपल्या नेत्यांची टीम तयार करून राज्यपालांचे मन वळवण्यासाठी उभी केली होती. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती हाताळताना ठाकरे सरकारला टीकेला सामोरे जावे लागत आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये किती विसंगती आहे ते वेळोवेळी दिसून येत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची हे आमचे सरकार नाही, असे म्हणणारी ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. विमान उड्डाणावरून मंत्री नवाब मलिक आणि मुख्यमंत्री यांच्या विधानातील विसंगती पुन्हा एकदा दिसून आली.


म्हणून पवारांनी घेतली भेट...
राज्यपालांची भेट ही कोणतिही राजकीय चर्चेसंदर्भातील नसून केवळ राज्याच्या परिस्थितीबद्दलचा आढावा घेणारी असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. मात्र, शरद पवार यांच्या आत्तापर्यंतची राजकीय कारकीर्द पाहता कुठलीही भेट सहजासहजी नसते हे त्यांच्या कृतीतून वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी नवीन खेळ मांडला जात आहे का, राज्याची सुत्रे पवारांनी आपल्या हाती घेतली आहेत का याची चर्चा पवारांच्या भेटीमुळे होणारच




राणेही भेटणार

भाजप खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेही राज्यपालांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. ज्याचे घटनात्मक प्रमुख असलेल्या राज्यपालांना नारायण राणे लवकरच राजभवनावर जातील. राज्यातील एकूण परिस्थितीबद्दल सरकारच्या विसंगतीबद्दल चर्चा होईलच परंतू या सर्व घडामोडींमुळे राज्याचे राजभवन पुन्हा एकदा राजकीय वर्तूळात चर्चाकेंद्र बनले आहे.








@@AUTHORINFO_V1@@