अखेर झुंज अपयशी ! ऑलिम्पिकवीर बलबीर सिंग सिनियर यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2020
Total Views |

balbir sing sr_1 &nb
 
 
नवी दिल्ली : भारतीय हॉकीमधील दिग्गज खेळाडू बलबीर सिंग सीनियर यांचे सोमवारी निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. मागील अनेक दिवस ते रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत होते. हृदयविकाराच्या झटका आल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. अखेर ही झुंज अपयशी ठरली. ऑलिम्पिक स्पर्धेत १९४८, १९५२ आणि १९५६ मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. भारताच्या सुवर्णयुगाचे ते साक्षीदार होते.
 
 
 
 
 
१९४८ रोजी लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांच्या कामगिरीमुळे भारतीय संघाला सुवर्ण पदक मिळवले होते. १९५२च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी भारतीय संघाचे उप कर्णधार पद भूषवले आणि सर्वाधिक गोल करत भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे १९५६मध्ये मेलबर्न येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कर्णधार पद भूषवून भारताला तिसऱ्यांदा सुवर्ण पदक मिळवून दिले. १९५७मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केले गेले आणि हा पुरस्कार पटकावणारे ते पहिले खेळाडू होते.
 
 
 
 
 
बलबीर सिंग सिनियर हे बराच काळ आजारी होते आणि त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना श्वसनेच्या त्रासानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक अभिजीत सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “सकाळी ६.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.”
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@