सुखाने मरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2020   
Total Views |

CMO Uddhav Thackeay_1&nbs



माणसं तडफडून मेली तरी तुम्ही शांत राहा, त्याला साहेब काय करणार? सत्ताधारी होणार असे त्यांनी वडिलांना वचन दिले होते. पण सत्ता मिळाल्यावर जनतेला वार्‍यावर सोडणार नाही, असे वचन दिले नव्हते. दिल्लीच्या मॅडम आणि बारामतीच्या काकांचे त्यात योगदान आहे. सेवा, निष्ठा वगैरे त्यांच्यासाठी. जनतेने त्यांना निवडून दिलेले नाही. त्यामुळे जनतेने स्वत:ची सर्वप्रकारची काळजी स्वत: घ्यावी. उगीच रडगाणे गाऊ नका, मरत आहेत म्हणून पीरपीर करू नका. शांत राहा... सुखाने मरा.



सत्ता मिळवण्यासाठी वाडवडिलांची सर्व पुण्याई धुळीस मिळवणार्‍यांनी घराबाहेर पडू नका, हा सल्ला मनावर घेतला आहे. या काळात कुणी जगो नाही तर मरो ते घराबाहेर निघायला तयार नाहीत. मात्र, या काळात जनतेला फुकटचा सल्ला द्यायला आणि कोरोनाला दम द्यायला मात्र ते विसरले नाहीत. कोरोनाला दम द्यायची पॉवर त्यांच्याकडे असणारच. कारण, वाघनखे, तलवार, खंजिर त्यांच्याकडेच आहे. इतकेच काय, बरोबर पाठीचा निशाणा साधून वार करणारे पण त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे ते सध्या स्वत:ला शक्तिमान समजत आहेत. पण त्यांच्या या अद्भुत शक्तीचा वापर जनतेसाठी कधी होईल? लोकांना रेशन मिळत नाही, लोकांना मुलभूत सुविधा मिळत नाही, मुंबई-मंडाळासारख्या ठिकाणी आजही पाणी माफिया टँकरने पाणी विकत आहेत. मागच्या महिन्यात महानगरपालिकेने आदेश दिला की कोरोना काळात सार्वजनिक शौचालय वापरणार्‍यांकडून पैसे घेऊ नये. पण आजही कित्येक ठिकाणी पैसे द्यावेच लागतात. पण शौचालय चालवणार्‍यांनी पैसे घेतले नाहीत तर शौचालयाच्या पाण्याचा, विजेचा आणि स्वच्छतेचा खर्च कोण देणार हे कुणीही सांगितले नाही. तात्पर्य शौचालयही नि:शुल्क नाही.


माणसे आजारी पडली, हॉस्पिटलला अ‍ॅडमिट व्हायचे आहे, अ‍ॅम्ब्युलन्स सेवा हवी आहे तर प्रतीक्षा यादीत राहावे लागते. ऑनलाईनद्वारे भाषणातून त्यांनी कोरोनाला दिलेल्या धमक्या ऐकू येतात, पण त्याने भाकरी मिळत नाही आणि कोरोनाच्या भीतीने तीळतीळ मरणार्‍यांच्या हाताला काही लागत नाही. त्यामुळे स्वत:ची सत्ता एनकेन प्रकारे टिकवून ठेवलेल्या या असल्या शक्तिमानांचे काय करायचे? शू... मात्र असे बोलू नका बरं, नाहीतर तुम्ही महाराष्ट्रद्रोही ठराल. तुम्ही महाराष्ट्राचे निष्ठावान तेव्हाच असाल जेव्हा यांच्या नाकर्तेपणालाही तुम्ही ‘बेस्ट’ म्हणत सलाम ठोकाल. माणसं तडफडून मेली तरी तुम्ही शांत राहा, त्याला साहेब काय करणार? सत्ताधारी होणार असे त्यांनी वडिलांना वचन दिले होते. पण सत्ता मिळाल्यावर जनतेला वार्‍यावर सोडणार नाही, असे वचन दिले नव्हते. दिल्लीच्या मॅडम आणि बारामतीच्या काकांचे त्यात योगदान आहे. सेवा, निष्ठा वगैरे त्यांच्यासाठी. जनतेने त्यांना निवडून दिलेले नाही. त्यामुळे जनतेने स्वत:ची सर्वप्रकारची काळजी स्वत: घ्यावी. उगीच रडगाणे गाऊ नका, मरत आहेत म्हणून पीरपीर करू नका. शांत राहा... सुखाने मरा.



पॉलिटिक्स प्यारा है...



कोरोना को भूल गये पॉलिटिक्स प्यारा है... असे युवराज म्हणाले. अर्थात हिंदीतून वाक्य आहे, म्हणजे तुम्हाला वाटले असेल की हे वाक्य दिल्लीच्या युवराजांचे असू शकेल. हिंदी काय फक्त थोरले राजकुमारच बोलतात का? आमचे धाकले युवराज पण हिंदी बोलतात. हिंदी काय गुजराती पण बोलतात. मागे ‘केम छो वरली’ असे काही होर्डिंग्ज लागलेले विसरलात? युवराजांनी ‘केम छो’ असे शत्रू राज्याच्या भाषेत म्हणजे गुजरातीत का म्हटले असेल. याचे कारण एकच असावे, त्यावेळी ‘हाऊडी मोदी’ वगैरे वगैरे ट्रम्प म्हणाले होते. त्याचवेळी राजा का बेटा राजाच बनेगा म्हणत यांना राजा बनवण्यासाठी एकदोन महाराजकारणी लोकांनी घाट घातला होता. एक दिव्यदृष्टीवाले म्हणाले होते लोक ‘हाऊडी मोदी’ ऐवजी ‘हाऊडी आदी’ही म्हणतील. पण ‘हाऊडी आदी’ झालेच नाही. असो तर मोदी गुजराती बोलतात तर आम्ही पण बोलू शकतो असे धाकल्या युवराजांच्या मनात असावे, म्हणून त्यांनी ‘केम छो वरली’ असे म्हटले असावेे.




आता या धाकल्या युवराजांची तुलना मोठ्या युवराजांशी केली जाते. अँकर अंजना ओम कश्पय यांनी हे भाकीत आधीच वर्तवले होते. देशभर ओळख मिळवण्यासाठी धाकल्या युवराजांना मोठ्या युवराजांचे काही गुण घ्यावेच लागतील ना? त्यामुळे त्यांनी हिंदीत म्हटले कोरोना को भूल गये, पॉलिटिक्स प्यारा है... मात्र, कोरोना तर गेल्या आठवड्यातही होता. तेव्हा तुम्ही तर सहपरिवार काळ्या टोपीवाल्यांना मुजरा करायला गेला होता. सत्ता टिकण्यासाठी दिल्ली बारामतीसमोर नतमस्तक होता, तेव्हा असे नाही वाटले का, की कोरोना को भूल गये पॉलिटिक्स प्यारा है. महाराष्ट्र त्यातही मुंबईत कोरोनाचा कहर आहे. मात्र, हे लोक आपली सत्त टिकवण्यात मश्गूल आहेत. काही ठिकाणी सॅनिटरी पॅड वाटण्यात आले. त्यावर कुणाची जाहिरात होती? ती जाहिरात खरीच असेल तर यांनी स्वतःचे आत्मपरिक्षण करावे... पॉलिटिक्स किसको प्यारा है..

@@AUTHORINFO_V1@@