मुंबई : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे फेसबुक लाईव्ह माध्यमातून ई व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दि. ३१ मे २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता संध्याकाळी हे व्याख्यान होणार असून शिवप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
गजाभाऊ मेहेंदळे यांचा जन्म १९ डिसेंबर १९४७ रोजी झाला. संरक्षण आणि सामरिकशास्त्र विषयात पुणे विद्यापीठातुन त्यांनी पदव्युत्तर पदवी (M.A.) घेतली. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युध्दात त्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवरून वार्तांकन केले होते. त्यांनी पन्नास वर्षे शिवचरित्र आणि समकालीन इतिहासावर विपुल संशोधन आणि लेखन केले आहे. 'Shivaji his Life and Times' हा संशोधनात्मक ग्रंथ इंग्रजीत तर राजा श्रीशिवछत्रपती हे २५०० पानांचे शिवचरित्र मराठीत लिहिले आहे. ज्यात ७००० हून अधिक संदर्भ त्यांनी दिले आहेत. त्यांचा मोडीलिपी, फारसी, संस्कृत, इंग्रजी, अरबी, पोर्तुगीज आदी भाषेतील संदर्भ कागदपत्रांचा अभ्यास केला आहे. त्यांच्या व्यासंगातून प्रकट होणाऱ्या या व्याख्यानाच्या सुवर्णसंधीचा लाभ सर्व शिवप्रेमींनी घ्यावा. आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांनाही वेळ राखून ठेवण्यासाठी कळवावे. या लाइव्ह ई व्याख्यानासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.