मजुरांसोबत ठाकरे सरकारची वागणूक अमानवीय : योगी आदित्यनाथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2020
Total Views |

migrants_1  H x




उत्तरप्रदेश
: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मायभूमीत परतणाऱ्या प्रवासी कामगार आणि मजुरांचे स्वागत केले. तसेच त्यांना त्यांच्या जन्मभूमीतच उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्याबाबत आश्वस्त केले. मात्र यावेळी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला. त्यांनी ट्विट करत, ठाकरे सरकारने  मजुरांशी अमानवीय वागणूक करत त्यांना आपल्या गावी जाण्यास भाग पडले असल्याची गंभीर टीका केली.



योगी पुढे म्हणतात कि," या मजुरांनी कष्टाने घाम गाळीत महाराष्ट्राच्या भूमीत काम केले. अशा आपल्या रक्त आणि घामाने या भूमीत राबणाऱ्या मजुरांना महाराष्ट्रातील शिवसेना व काँग्रेस पक्षाने धोका दिला. लॉकडाउनमध्ये त्यांची फसवणूक करण्यात आली. राज्यात अडकलेल्या मजुरांना वाईट काळात सरकारने मदत न करता आहे त्या स्थितीत सोडले आणि त्यांना घरी जाण्यास भाग पाडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या अमानुष वर्तनाबद्दल माणुसकी त्यांना कधीही माफ करणार नाही."





पुढे ते म्हणतात, "आपल्या गावी परतलेल्या सर्व बंधू-भगिनींची राज्यात काळजी घेतली जाईल. आपली कर्मभूमी सोडण्यास भाग पाडल्यानंतर त्यांच्याबद्दल काळजी करण्याचे नाटक शिवसेना काँग्रेसने नाटक करू नये. सर्व कामगार मी विश्वास देतो की आता त्यांचे जन्मस्थान नेहमीच त्यांची काळजी घेईल, शिवसेना आणि कॉंग्रेस यांनी निश्चित राहावे." पुढे संजय राऊत यांच्यावर टीका करताना आदित्यनाथ म्हणतात की, "होय, फक्त भुकेलेल्या मुलालाच त्याची आई आठवते. महाराष्ट्र सरकारने अगदी 'सावत्र आई' म्हणून जरी या मजुरांना व गरजुंना पाठिंबा दर्शविला असता, या कठीण आणि गंभीर संकटात जीव धोक्यात घालून उत्तर प्रदेशातील रहिवासी त्यांच्या राज्यात परत आले नसते."





@@AUTHORINFO_V1@@