कुणाच्या आदेशात 'पावर'? : विमानसेवेच्या निर्णयावर महाविकास आघाडीत दुमत

    24-May-2020
Total Views |

NCP _1  H x W:




मुंबई
: राज्यातील तीन पक्षातील सरकारांच्या नेत्यांचे म्हणणे विसंगत असल्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी देशांतर्गत विमान वाहतुकीच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केलेले असताना अवघ्या काही तासातच राज्याचे अल्पसंख्यांक व कामकाजमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देशांतर्गत विमान वाहतुकीस परवानगी देत असल्याचे जाहीर केले.




त्यामुळे आता मुंबईतूनही रोज २५ विमान उड्डाणे सुरू होणार आहेत,असे मलिक यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले. या निर्णयावर आपण राज्याच्या मुख्य सचिवांशी बोललो असल्याचा दावा ही त्यांनी केला. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज २४ मी रोजी जनतेला संबोधित करताना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याशी आपण चर्चा केली असून केवळ अत्यावश्यक विमान उड्डाणाची परवानगी दिली जावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख पाहता हा निर्णय ३१ मेनंतर घेऊ असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील तीन पक्षातील सरकारांच्या नेत्यांचे म्हणणे विसंगत असल्याचा प्रत्यय आला आहे.