दर ३९ सेकंदाला एक सायबर हल्ला ; संयुक्त राष्ट्राने दिला अलर्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2020
Total Views |

united nations_1 &nb




न्यूयॉर्क (संयुक्त राष्ट्र) :
जगभरात कोरोनासाथीने थैमान घातल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यादरम्यान अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्यायदेखील आपल्या कर्मचाऱ्यांना दिला. त्यामुळे एकीकडे डिजिटल प्लॅटफॉर्मची उपयुक्तता वाढली आहे तर दुसरीकडे सायबर गुन्ह्यांच्या चढत्या आलेखाने चिंता वाढली आहे. संयुक्त राष्ट्राच्या निशस्त्रीकरण प्रमुख इझुमी नाकामित्सू यांनी जगातील सर्व देशांना सायबर हल्ल्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे सोशल माध्यमांवरील नागरिकांचे अवलंबून राहणे वाढले आहे. संयुक्त राष्ट्र निशस्त्रीकरण प्रमुखांनी म्हणाले की, कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात वापरकर्त्यांची फसवणूक करणाऱ्या ईमेलमध्ये ६०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

इझुमी नाकामित्सू यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) च्या अनौपचारिक बैठकीत ही माहिती दिली. ते म्हणाले की, कोरोना विषाणूचे संकट जगभर पसरले आहे आणि यामुळे तंत्रज्ञानावरील दबाव वाढला आहे. सर्व कामे ऑनलाईन केली जात आहेत. त्यांनी पुढे स्पष्ट केले की जगभरातील वैद्यकीय संशोधन सुविधा आणि आरोग्य संस्थांवर सायबर हल्ल्यांच्या बातम्या देखील येत आहेत.

नाकामित्सू यांनी आंतरराष्ट्रीय दूरसंचार युनियनचा हवाला देत म्हटले आहे की, जवळपास ९० देश सायबर सुरक्षेच्या तयारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव लक्षात घेता बहुतेक कामांसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मला प्राधान्य दिले जात आहे. सद्य परिस्थितीत लोक डिजिटल प्लॅटफॉर्मवर अधिक अवलंबून आहेत.

भारतातही सायबर हल्ले
आयएएनएसच्या मते, भारतात सायबर हल्ल्यांच्या बाबतीत, मागील वर्षाच्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत यंदा २०२० च्या पहिल्या तिमाहीत ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका नवीन अहवालाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. कॅस्पर स्काय सिक्युरिटी नेटवर्क (केएसएन) च्या अहवालानुसार, भारतातील उत्पादनांनी यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत ५२,८२०,८७४ स्थानिक सायबर हल्ल्यांचा शोध लावत असे हल्ले रोखले.
@@AUTHORINFO_V1@@