ऐकावे ते नवलच ! हा मास्क घालून जेवण करणेही शक्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2020
Total Views |

israil mask_1  



इस्रायल
: सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूविरूद्ध लढा देत आहे. प्रत्येक देश आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा संसर्ग रोखायचा प्रयत्न करत आहे. प्रयोगशील वृत्तीने नवीन मार्ग विकसित करीत आहे. दरम्यान, इस्त्रायली कंपनीने असाच एक प्रयोग केला आहे. या कंपनीने एक अनोखा मास्क तयार केला आहे. या मास्कची ख्यासियत म्हणजे जेवताना देतील तो काढण्याची आवश्यकता नाही.


आपण ते घालून आरामात जेवण करू शकता. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी होईल. मिळालेल्या माहितीनुसार आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेला हा मास्क रिमोटद्वारे चालवता येतो. हा मास्क तयार करणारी कंपनी म्हणते की हा मास्क घालणारी व्यक्ती रिमोट कंट्रोलच्या मदतीने हा मास्क कार्यान्वित करू शकते. या व्यतिरिक्त हे डिव्हाइस आपोआपही कार्य करते असा कंपनीचा दावा आहे. यामुळे आता या मास्कबाबत लोकांमध्ये उत्सुकता वाढत आहे. या मास्कमध्ये सेन्सर्स असतील जे हात किंवा चमचा मास्कनजीक येताच कार्यांवित होतील व उघडतील.


या महिन्यापासून मास्कचे उत्पादन सुरू होईल

हे मास्क तयार करणार्‍या कंपनीचे उपाध्यक्ष असफ गितेलिस म्हणतात की, जेव्हा चमचा तोंडाजवळ येईल हा मास्क आपोआप उघडेल. त्याशिवाय रिमोटद्वारेही हा मास्क उघडणे शक्य आहे. सध्या हा मास्क सर्वसामान्यांना उपलब्ध नाही. या महिन्यापासून कंपनी मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करण्याची तयारी करत आहे. असा विश्वास आहे की बाजारात मास्क आल्यानंतर ग्राहकांना यासाठी सामान्य वैद्यकीय मास्कच्या किंमतीपेक्षा दोनश ते तीनशे रुपये अधिक द्यावे लागतील.
@@AUTHORINFO_V1@@