'अम्फान' परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी बंगालमध्ये दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2020
Total Views |
modi_1  H x W:



पश्चिम बंगालनंतर पंतप्रधान ओडिशामधील चक्रीवादळ परिस्थितीचा घेणार आढावा

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथील महा चक्रवत अम्फानच्या हाहाकारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दोन्ही राज्यांचा दौरा करणार आहेत. शुक्रवारी सकाळी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमधील कोलकाता विमानतळावर पोहोचले, तेथे राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर पंतप्रधान मोदी अम्फानबाधित भागाचे हवाई सर्वेक्षण करणार. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी गुरुवारी सांगितले की, ‘चक्रीवादळामुळे पीडित लोकांची सर्वोतोपरी मदत केली जाणार आहे’ पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास तीन महिन्यांनंतर दौरा करणार आहेत. उत्तर प्रदेशातील चित्रकूट आणि प्रयागराज येथे पंतप्रधान मोदींनी २९ फेब्रुवारीला भेट दिली होती. कोरोना संकटामुळे तब्बल ८३ दिवसांनी पंतप्रधान पश्चिम बंगाल आणि ओडिशाचा दौरा करणार आहेत.







ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला. अम्फान चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात त्यांनी बंगालला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी म्हंटले होते की ‘मी माझ्या आयुष्यात एवढ्या तीव्र चक्रीवादळ आणि तोटा कधीही पाहिला नाही.’ त्याच बरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चक्रीवादळ बाधित भागाची पाहणी करण्यासाठी येण्याची विनंतीदेखील केली होती.


दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला. परिस्थितीशी सामना करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. अम्फानने पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश केला आहे. ७२ लोक मरण पावले असून, दोन जिल्हे पूर्णपणे उध्वस्त झाले. या वादळामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत, अनेक पूल उद्ध्वस्त झाले आहेत आणि सखल भाग पाण्याखाली गेले आहेत.




पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "कोरोनाच्या संकटात पश्चिम बंगालवर आलेले अम्फान वादळाचे संकट थोपवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येऊन मदत करतील. या वादळात आत्तापर्यंत ८० लोकांनी आपला जीव गमावला आहे, त्यांच्या कुटूंबासोबत आम्ही आहोत. कृषि, उर्जा आणि व्यापार क्षेत्राचे यात खूप मोठे नुकसान झालेले आहे."

बंगालच्या खाडीत उठलेले आत्तापर्यंतचे सर्वात मोठे वादळ अम्फान पश्चिम बंगाल-ओदीशा येथे हाहाःकार माजवत बांग्लादेशकडे रवाना झाले आहे. वादळामुळे अरुणाचल प्रदेश, मेघालयमध्ये पाऊस कोसळत आहे. शुक्रवारपर्यंत हा पाऊस कोसळ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


राज्याचे एक लाख कोटींचे नुकसान झाले असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. दक्षिण २४ परगणा जिल्हे सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत. कित्येक इमारतींचे नुकसान झाले आहे. कोलकातासह अन्य दुसऱ्या भागांतील विजेचे खांब कोसळ्याने विज, टिव्ही, टेलिफोन आणि इंटरनेटच्या वाहिन्यांचे नुकसान झाले आहे.


१२००हून अधिक मोबाईल टॉवर खराब झाले आहेत. कित्येक भागात नेटवर्क नसल्याने संपर्क तुटला आहे. अम्फान बंगालमध्ये आलेले २८३ वर्षांतील सर्वात मोठे वादळ आहे. १७३७मध्ये ग्रेट बंगाल वादळमुळे तीन लाखांहून जास्त मृत्यू झाले होते. ओदीशामध्ये १९९९ मध्ये सुपर वादळ आले होते. ज्यात १० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.




@@AUTHORINFO_V1@@