देशातील कोरोनाग्रस्तांच्या वाढीचा सगळ्यात मोठा आकडा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2020
Total Views |

Corona Virus_1  



गेल्या २४ तासांत ६०८८ नव्या रुग्णांची नोंद; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या


नवी दिल्ली : कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी देशात लॉकडाऊन असूनही, संक्रमण गेल्या अनेक दिवसांपासून वाढत आहे. गेल्या २४ तासात कोरोनाचे सहा हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत एका दिवसात आढळलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्णांची ही नोंद आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशात ११८४४७ कोरोनाचे रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत ६०८८ नवी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मृतांची संख्या ३५८३ झाली आहे.


महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत ४१६४२ रुग्ण आढळले आहेत, तर ११७२६ लोक बरे झाले आहेत. त्याचबरोबर राज्यात मृतांची संख्या वाढून १४५४ झाली आहे. तामिळनाडूमध्ये १३९६७ कोरोनाग्रस्त आढळले असून, असून त्यापैकी ६२८२ लोक बरे झाले आहेत. तर, ६२ लोक आतापर्यंत मृत्यूमुखी पडले आहेत.


उत्तर प्रदेशात ५५१५ लोकांना कोरोना विषाणूची झाली आहे. तर, १३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये कोरोनाचे १२९०५ रुग्ण आढळले आहेत, तर मृतांचा आकडा ७७३ वर पोहोचला आहे. राजधानी दिल्लीतही कोरोनाचा कहर सुरू आहे. एकूण रुग्ण संख्या ११६५९ झाली आहे. यापैकी ५५६७ लोक बरे झाले आहेत, तर १९४ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.


आंध्र प्रदेशात २६४७, आसाममध्ये २०३, बिहारमध्ये १९८२, छत्तीसगडमध्ये १२८, हरियाणामध्ये १०३१, कर्नाटकात १०६५ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत १४४९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.


समाधानकारक बाब म्हणजे जवळपास ४०% टक्के रुग्ण बरे कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण रुग्णांपैकी ४८५३४ संक्रमित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृत पावलेल्यांपैकी ७०% लोक हे इतर आजारांनी ग्रस्त होते.
@@AUTHORINFO_V1@@