पुलवामात भ्याड दहशतवादी हल्ला ; १ जवान शहिद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2020
Total Views |

crpf_1  H x W:
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दोन पोलिस जखमी झाले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या जवानाची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी आणि सैन्याने हल्ला झालेल्या भागात घेराव घालून शोध मोहीम सुरू केली आहे.
 
यामध्ये जम्मू-काश्मीर पोलिसात हेड कॉन्स्टेबल म्हणून तैनात असलेल्या अनूप सिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर कॉन्स्टेबल मोहम्मद इब्राहिम गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लॉकडाऊनमुळे पुलवामामध्ये पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांमार्फत बंदोबस्त लावण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास दहशतवाद्यांनी अचानक या ब्लॉकवर गोळीबार सुरू केला. काही कळायच्या आतच हा हल्ला झाल्याने दहशतवाद्यांनी काही जवानांवर गोळीबार करत चौकीवर हल्ला चढविला होता.


घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात
पोलीस व जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले परंतु हे दहशतवादी तेथून पळून गेले. सैन्याने या भागाला वेढा घातला असून शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. मात्र, अद्याप कोणताही दहशतवादी पकडलेला नाही. या घटनेची माहिती मिळताच मोठा फौजफाटा याभागात तैनात करण्यात आला.


परिसराला वेढा घालत शोध मोहीम सुरू
सीआरपीएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला पुलवामाच्या बाजारपेठेजवळील पोलिस आणि सीआरपीएफच्या नाकाबंदीवर झाला. सैन्य आणि पोलिसांनी संपूर्ण परिसराला सर्व बाजूंनी वेढले असून शोधमोहीम सुरु केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@