बंगालवर कोरोनानंतर 'अम्फान'चे संकट : देशवासीयांनी केल्या प्रार्थना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2020
Total Views |

Amphan_1  H x W


अम्फानने घेतला ७२ जणांचा बळी

बंगाल : पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये बुधवारी हाहा:कार माजवल्यानंतर महाचक्रीवादळ अम्फानचा जोर मंदायला सुरुवात केली आहे. हवामान विभागानुसार, मागील ६ तासांत अम्फान २७ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने उत्तर-ईशान्यकडे सरकला आहे. पुढील तीन तासांत हे आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालयात आज हलका पाऊस आणि ताशी ३०-५० कि.मी. प्रति तास वेगाने वारा वाहू शकतो. वादळामुळे पश्चिम बंगालमध्ये वार्‍याचा वेग बुधवारी ताशी १९० किलोमीटरपर्यंत पोहोचला होतो.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी म्हणाल्या की, वादळामुळे राज्यात ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, राज्यात ५५०० पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले आहे. हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले. मी असे दृष्य कधीच पाहिले नाही. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना राज्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेण्याची अपील केली. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करुन म्हटले की, ‘बंगालमधील विनाशाचे दृष्य पाहिले. संपूर्ण देश बंगालसोबत आहे. राज्यातील नागरिकांसाठी प्रार्थना करतो. राज्याच्या मदतीसाठी कोणतीच कसर ठेवणार नाहीत.’

बुधवारी दुपारी अडीच वाजता अम्फान वादळ कोलकात्यात दाखल झाले. संध्याकाळी साडे सात वाजता हवेचा वेग मंदावला. या पाच तासांत वादळामुळे बरेच नुकसान झाले. वादळ येण्यापूर्वीच ६.६ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. बंगालमध्ये मागील तीन दिवसांत ५ लाख लोकांना किनारपट्टी भागातून निवारा गृहात हलविण्यात आले. ओडिशामध्ये १.६ लाख लोकांना वाचविण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@