विमान प्रवासात 'आरोग्य सेतू' आवश्यक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2020
Total Views |
Airport _1  H x

नवी दिल्ली : २५ मे पासून सुरू होणाऱ्या विमान उड्डाणांसाठी केंद्र सरकारतर्फे नियमावली जाहिर करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या अटी शिथिल करून आता देशांतर्गत विमान प्रवासाला परवानगी देण्यात येत असली तरीही प्रवास करत असतानाची नियमावली कडक करण्यात आली आहे. विमान प्रवासादरम्यान सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे.


प्रवासात मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. विमानतळावर किमान दोन तासांपूर्वी पोहोचावे लागणार आहे. मास्कसह एअरपोर्ट टर्मिनल प्रवेशासाठी मास्क आणि बुटांचे कव्हर वापरणे गरजेचे असणार आहे. प्रत्येकाला आपल्या मोबाईल फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप इनस्टॉल करावे लागणार आहे. तसेच अॅपचे स्टेटसही ग्रीन असायला हवे.


विमानतळावर पोहोचण्यासाठी अधिकृत टॅक्सीचा वापर करावा लागणार आहे. विमानतळावर भरावे लागणारे अन्य शुल्कही डिजिटल पेमेंटद्वारे द्यावे लागणार आहे. कुठल्याही प्रवाशापासून सहा फूट दूर अंतर ठेवावे लागणार आहे. आता केवळ वेब चेक इन हाच पर्याय प्रवासासाठी उपलब्ध असेल. 'चेक-इन कियॉस्‍क' सेवाही उपलब्ध असणार आहे.


विमानात प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांच्या शरिराचे तापमान तपासले जाणार आहे. जर त्यात शंकास्पद बाब आढळून आली तर प्रवास नाकाराला जाऊ शकतो. प्रवाशांनी उपस्थित क्रू मेंबर्स सोबत कमीत कमी संवाद साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. काही विमानतळांवरील झोन लक्षात घेता प्रवाशांना पीईपी किटही बंधनकारक केले जाऊ शकते. एका प्रवाशाला केवळ २० किलो वजन नेण्याची परवानगी असणार आहे.


८० वर्षावरील व्यक्तींना तूर्त विमान प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही, विमानतळावर कोरोना रुग्णाशी आलेला संपर्क, क्वारंटाईन झाल्याचा कालावधी आणि अन्य माहितीही द्यावी लागणार आहे. तिकीट बुकींग करत असतानाच विमान कंपन्या ग्राहकांना एक अर्ज भरून देतील. त्यात सर्व माहिती भरावी लागणार आहे.





@@AUTHORINFO_V1@@