श्रीरामजन्मभूमी परिसरात मिळाले विक्रमादित्यकालीन मंदिराचे अवशेष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2020
Total Views |

ramjanmabhumi_1 &nbs




अयोध्या
: अयोध्येत श्रीरामजन्मभूमी परिसरात राममंदिर निर्माणाचे काम वेगात सुरु झाले आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीरामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात सपाटीकरणाचे काम सुरु आहे. यादरम्यान या परिसरात प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. यात कलश, देवी देवतांच्या शिल्पे असलेले दगडी खांब, देवतांच्या खंडित मूर्ती, कोरलेले शिवलिंग, प्राचीन विहिरी आणि कमानी यांचा समावेश आहे. वास्तविक, रामललाच्या गाभाऱ्यात ११ मेपासून सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच हे स्पष्ट झाले होते की ज्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान होते ते विक्रमादित्य युगिन मंदिर असल्याचे स्पष्ट झाले. परंतु, ज्या मंदिराचे अवशेष बुधवारी सपाटीकरण दरम्यान आढळले, ते त्याच मंदिराचे आहे की नंतरच्या मंदिराचे आहे हे अजून स्पष्ट झाले नाही.





उत्खननात सापडल्या पुरातन मूर्ती  आणि कोरीव शिवलिंग


श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय म्हणाले की, सपाटीकरणाच्या कामात ३ जेसीबी, १ क्रेन, २ ट्रॅक्टर आणि १० मजूर तैनात करण्यात आले आहेत. ते म्हणाले की, ११ मेपासून सपाटीकरणाच्या कार्यक्रमात एएसआयने हायकोर्टाच्या आदेशानुसार उत्खनन केले असता आसपासच्या भागात मोठ्या संख्येने पुरातन वास्तू, देवतांच्या खंडित पुतळे, फुलांचे कलश, अमलक दोरजंब आदी आढळले. आहे. आतापर्यंत ७ ब्लॅक टच स्टोन खांब, ६ रेडसँड स्टोन कॉलम, ५ फूट कोरलेली शिवलिंग आणि कमानी दगड मिळाले आहेत.



ayodhya_1  H x


रामजन्मभूमी परिसरात विक्रमादित्यकालीन मंदिरासह इतरही बऱ्याच मंदिरांच्या अवशेषांचे दफन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापरिसरात अनेक मंदिराचे अवशेष देखील आहेत ज्यात अनेक देवतांच्या पुरातन आणि पौराणिक मंदिरांचा समावेश आहे. बुधवारी सापडलेल्या अवशेषांमध्ये विक्रमादित्यने दोन हजार वर्षांपूर्वी मंदिर बांधले होते, त्याच निकषाच्या समान स्तंभांवर आधारित होते. मंदिराच्या बांधकामासाठी स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून मंदिराचे पुरातन अवशेष मिळवल्याचा तपशील सविस्तरपणे देण्यात आला आहे, परंतु त्या पुरातन वास्तूंबद्दल काहीही सांगण्यास सध्या नकार देण्यात आला आहे. तज्ञांच्या तपासणीनंतर पुरातन वास्तूंबद्दल अंतिम मत व्यक्त केले जाऊ शकते. साकेत महाविद्यालयातील पुरातन इतिहास विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. कविता सिंह म्हणतात की, रामजन्मभूमी परिसरात भारताच्या सुवर्ण भूतकाळाची गाथा आहे. ती हळूहळू सर्वांसमोर येईलच.श्रीरामजन्मभूमी ट्रस्टकडून या पुरातन वस्तू जतन करण्याच्या योजना देखील आखल्या जात आहेत.
@@AUTHORINFO_V1@@