१०वी-१२वीच्या परीक्षांसाठी लॉकडाउनच्या नियमांत सूट : केंद्रीय गृह मंत्रालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2020
Total Views |


10th_1  H x W:


नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यासाठी लॉकडाऊनचे नियम शिथिल केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आवडी लक्षात घेऊन सामाजिक अंतर राखत, फेस मास्क वापरणे इत्यादी अटींसह दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यासाठी लॉकडाऊन नियम शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला.


केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, बोर्ड परीक्षा घेण्यासाठी राज्य सरकार आणि सीबीएसईकडून अनेक विनंत्या प्राप्त झाल्या. त्यानंतर या सर्व सूचना व विनंत्या लक्षात घेता गृह मंत्रालयात याबाबत चौकशी झाली आहे. यानंतर परीक्षेसाठी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, कंटेन्टमेन्ट झोनमध्ये कोणत्याही परीक्षा केंद्राला परवानगी दिली जाणार नाही. शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना फेस मास्क घालणे बंधनकारक असेल. याव्यतिरिक्त, परीक्षा केंद्रांवर थर्मल स्क्रीनिंग आणि सॅनिटायझरची व्यवस्था केली जाईल. सामाजिक अंतराबाबत असणाऱ्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.




ते म्हणाले की, विविध मंडळांकडून घेतल्या जाणार्‍या परीक्षांच्यादृष्टीने परीक्षांचा कालावधी निश्चित केला जावा. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर नेण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे विशेष बसेसची व्यवस्था केली जाऊ शकते. कोरोना विषाणूच्या फैलावामुळे मार्च महिन्यापासून देशातील सर्व शाळा बंद आहेत. संसर्गाचा धोका लक्षात घेता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षाही बर्‍याच राज्यांत रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्यामुळे दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा घेणे राज्यांना शक्य नव्हते.


सीबीएसईने परीक्षेसाठी बनविले हे नियम : 

सर्व विद्यार्थ्यांनी पारदर्शक बाटलीमध्ये स्वतःचा हॅन्ड सॅनिटायझर आणणे.

सर्व विद्यार्थ्यांनी मास्कने आपले नाक आणि तोंड झाकले पाहिजे.

सर्व विद्यार्थ्यांनी शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक

पालकांनी मुलांची काळजी घेणे आवश्यक.
@@AUTHORINFO_V1@@