दिलासादायक ! जगभरातील ४० देश लॉकडाऊन फ्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2020
Total Views |

italy_1  H x W:


नवी दिल्ली
: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातील देशांनी लॉकडाउन जाहीर केला. संपूर्ण जगातील सर्वाधिक कोरोना प्रभावित ८० देशांपैकी ४०देशांनी लॉकडाउन उघडले आहे. त्यामुळे या देशांमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. या ४०देशांमध्ये सर्वाधिक २६ युरोपियन देश आहेत. त्यापैकी सहा देश आहेत जे आपल्या देशांच्या सीमा उघडण्यासदेखील तयार आहेत.



ऑरा व्हिजनसह इतर संशोधन संस्थांच्या अहवालात हा दावा केला गेला आहे. लॉकडाउन उघडणार्‍या देशांमध्ये अनेक उद्योग, दुकाने, रेस्टॉरंट्स, शाळा, समुद्रकिनारे, बार आणि इतर ठिकाणे पुन्हा सुरु झाले आहेत. लॉकडाउन उघडण्यासाठी जास्तीत जास्त २६ देश युरोपमधील आहेत. कोरोनामुळे प्रभावित झालेल्या मुख्य १०देशांपैकी सहा देश हे युरोपमधीलच आहेत.


अमेरिका आणि आशियाई देशांनी लॉकडाऊन उघडले

अमेरिका आणि आशियाई देशांमध्येही लॉकडाउन उघडले गेले आहे. या देशांच्या प्रशासनाचा असा दावा आहे की, अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी लॉकडाउन उघडणे आवश्यक आहे. आता सहा देश सीमा उघडण्याचा आग्रह धरत आहेत. बेल्जियम, जर्मनी आणि स्वित्झर्लंड १५ जूनपासून परदेशी पर्यटकांना परवानगी देण्याच्या विचारात आहेत. या महिन्याच्या शेवटी याची घोषणा होऊ शकते.


अनेक देशांनी आपल्या सीमा खुल्या करण्याचा आग्रह धरला
ग्रीस १ जुलैपासून परदेशी पर्यटकांसाठी सीमा उघडणार आहे. ३ जूनपासून इटली आपली सीमा उघडेल. नेदरलँड्सने काही देशांमधून प्रवाशांना येण्याची परवानगी दिली आहे. पोलंड १३ जूनपासून सीमा उघडू शकेल. जगातील १९५ देश कोरोनामुळे त्रस्त आहेत. चीन वगळता इतर देशांनी मार्च किंवा एप्रिलमध्ये लॉकडाऊन घोषित केले.



अमेरिकेच्या ५० पैकी ३० राज्यांमध्ये लॉकडाउन उघडले

अमेरिकेच्या ५० पैकी ३० राज्यांमध्ये लॉकडाउन उघडले आहे. चीनच्या भिंतीवर देखील लॉकडाऊन खुले करताच मोठ्या संख्येने देशांतर्गत पर्यटक दाखल होत आहेत. थायलंडमध्ये दुकाने, फूड कोर्ट सुरू आहेत.



ऑस्ट्रेलियामध्ये त्याच दिवशी शाळेत जाण्याचे नियम
फ्रान्समध्ये ११ वर्षाच्या मुलांना मास्क घालून शाळेत येण्याची परवानगी दिली आहे. तर मोठ्या मुलांना वायसर कॅप घेऊन शाळेत येणे बंधनकारक आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आठवड्यातील एकच दिवस शाळेत जाणे बंधनकारक आहे, उर्वरित दिवस घरीच अभ्यास करावा लागेल. तैवान आणि नेदरलँडमधील शाळा प्लास्टिकच्या पडद्याने विभागल्या आहेत. फिनलँडमध्ये मुलांना एकमेकांना हात मिळविण्याची आणि मिठी मारण्याची परवानगी नाही, त्यांना नवीन मार्ग शिकवले जात आहेत.
@@AUTHORINFO_V1@@