आदिवासींची माथी भडकावून धर्मांतर आणि देशविघातक कृत्य करण्याचा डाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2020
Total Views |


suresh shinda_1 &nbs


तलासरी तालुक्यातील उध्वा या गावात शेजारील गावातून काही विशिष्ट विचारसरणीच्या संघटनांचे गावातील तरुण व आदिवासींची माथी भडकविण्याचे काम जोरात सुरु आहे. एनआरसी आणि जनगणनेबाबत आदिवासीमध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. राज्यघटनेविषयी देखील खूप गैरसमज पसरविले जात आहेत. याबाबत तलासरी तालुक्यातील उध्वा गावचे सरपंच सुरेश शिंदा यांनी दै. मुंबई तरुण भारतला दिलेली माहिती.



मी मागील अडीच वर्षांपासून तलासरी तालुक्यातील उध्वा गावचे सरपंच म्हणून कार्यरत आहेत. आमच्या गावाचा विकास होऊ नये व इथल्या आदिवासींमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम आजूबाजूच्या गावातील काही देशविघातक प्रवाह करत असल्याचा अनुभव आम्हाला आला. याच अनुभवानुसार
, आमच्या गावात काही या देशविघातक पक्ष, संघटना गावातील तरुण व आदिवासींची माथी भडकविण्याचे काम करत असल्याचे आमच्या निदर्शनात आले. एवढेच नाही तर या संघटना लोकशाही व्यवस्थेला तडे देत देशविघातक कृत्ये करण्यासाठी आमच्या गावातील तरुणांना देशविरोधी कार्ये करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत.



याविषयी पहिला अनुभव म्हणजे
, आमचे गाव हे तालुक्यातील बाजारपेठेचे गाव आहे. गावात बाहेरून काही व्यापारी येत असतात. हे व्यापारी केवळ व्यापार करत नाहीत तर आपली विशिष्ट विचारसरणीने गावातील तरुणांची दिशाभूल करण्याचे काम करतात. याची प्रचिती २९ जानेवारीला २०२० ला नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी जबरदस्तीने पाळण्यात आलेल्या बंदच्या दरम्यान आली. या बंदसाठी सुद्धा या बाहेरच्या गावातील काही लोक आमच्या गावात आले व त्यांनी जबरदस्तीने इथली बाजारपेठ बंद केली. यावेळी आमच्या गावातील व्यापाऱ्यांना व तरुणांना ते सांगत होते, नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी ही देशात लागू होऊ नये, हा देश संविधानानुसार चालत नाहीये अशा अनेक गैरसमज आमच्या आदिवासी समाजात ते पसरवत आहेत.



आमच्या गावातील आदिवासी समाज हा हिंदू रूढी
, परंपरा मानणारा आहे. हिमाय असो हिरोबा देव असो किंवा भवानी माता असो या देवतांना पुजणारा हा आमचा आदिवासी समाज. त्यामुळे गावातील आदिवासींना हिंदू धर्माचे व परंपरांचे पालन करणाऱ्या या समाजाला वेगळ्या विचारांकडे नेण्याचे काम आमच्या गावात काही विशिष्ट विचारांच्या लोकांनी सुरु केले आहे. आदिवासींनी आपल्या रूढी व परंपरांपासून, देवतांपासून भरकटू नये म्हणून त्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. आदिवासींनी सर्व सण, उत्सव आनंदाने साजरे करावे व आपल्या देवतांचे पूजन करावे त्यांना मानावे हीच एक अपेक्षा आहे.आमच्या गावातील आदिवासी मनोभावे देवी देवतांचे पूजन करतात. मी स्वतः देखील करतो.



परंतु
, गावातील आदिवासींच्या अशिक्षित व आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेत त्यांच्यात फूट पाडण्याचे काम या संघटना करत आहेत. आमच्या गावात माथी भडकविण्याचे काम करणाऱ्या या संघटनांमध्ये डाव्या विचारसरणीच्या संघटना, काही ख्रिश्चन संघटना व इतर काही संघटना ज्या आपल्या संविधानाच्या विरोधात काम करत आहेत अशांचा समावेश आहे. या संघटना गावातील आदिवासींच्या आर्थिक समस्यांचा फायदा घेत त्यांना देशविघातक कृत्ये करण्यासाठी भाग पडत आहेत. गावातील काही आदिवासीच्या गरिबीचा किंवा त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन या संघटना आमच्या गावातील आदिवासींना धर्मांतरण करण्यास भाग पडत आहेत. आमच्या या गावात आदिवासी समाजातील तरुणांना व समाजाला या गैरसमजाला बळी पडून माथी भडकविण्याचे काम दुसरे तिसरे कोण नाही तर शेजारील गावातील काही तथाकथित पुढारी मंडळीच करत आहेत.


- सुरेश शिंदा
, सरपंच, उध्वा

  तालुका : तलासरी

( शब्दांकन : गायत्री श्रीगोंदेकर )

@@AUTHORINFO_V1@@