कामगारांना घेऊन नाशिकमधून दुसरी रेल्वे उत्तरप्रदेशकडे रवाना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2020
Total Views |

train_1  H x W:


कामगारांनी दिल्या ‘जय महाराष्ट्रा’च्या घोषणा

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी सलग तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवला आहे. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी केंद्राने देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या कामगारांचे घरी जाण्याचे मार्ग खुले केले. यानुसार नाशिक येथे अडकून पडलेल्या कामगारांसाठी आज उत्तरप्रदेशमध्ये जाण्यासाठी दुसरी रेल्वे सोडण्यात आली आहे. यावेळी प्रवाशांनी जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या.





नाशिक येथे कामानिमित्त वास्तव्याला असलेल्या साडेआठशे नागरिकांना घेऊन ही गाडी निघाली आहे. प्रवासासाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि जेवण तसेच बिस्किटे असे पदार्थ त्यांना प्रशासनाने सोबत दिले आहेत. नाशिक रोडच्या रेल्वे स्थानकातून ही विशेष रेल्वे सुटल्यानंतर या प्रवाशांनी जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकार जिंदाबाद अशी घोषणाबाजी केली.


दरम्यान, याआधीही नाशिक येथून मध्य प्रदेशातील कामगारांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी शुक्रवारी विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली होती.
@@AUTHORINFO_V1@@